Champions Trophy 2025 Sanju Samson unlikely to get a chance in squad : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा व्हायला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. निवडीबाबत बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीसीसीआयच्या निवड समितीला दुबईला जाणाऱ्या १५ सदस्यीय संघात दमदार खेळाडूंचा समावेश करायचा आहे. या संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी दोन मोठे दावेदार आहेत. संजू सॅमसनचे नाव यष्टिरक्षक म्हणूनही पुढे येत होते, पण आता त्याची निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे, असं का झालं जाणून घेऊया.

संजू सॅमसनवर टांगती तलवार –

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतच्या नावाला पहिली पसंती आहे, तर ध्रुव जुरेल दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात सामील होऊ शकतो. याचा अर्थ केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल, पण यष्टीरक्षण करणार नाही. त्यानुसार, सॅमसन वनडेऐवजी टी-२० फॉरमॅटमध्ये अधिक फिट दिसत असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. कारण सॅमसनने त्याच्या शेवटच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत.

काय आहे कारण?

याशिवाय वनडे संघात स्थान मिळवू न शकण्याचे एक कारण म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास दिलेला नकार. विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी केरळ शिबिरात सामील न झाल्याने संजू सॅमसनची केरळ संघात निवड झाली नाही. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू खेळत आहेत आणि आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, सॅमसनची इंग्लंडविरुद्धच्या २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभऐवजी सॅमसनला मिळावी संधी – हरभजन सिंग

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मात्र सॅमसनला पाठिंबा देताना दिसला, जिथे त्याने ऋषभ पंतच्याऐवजी संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळायला हवे असे म्हटले. तो म्हणाला, “मला विश्वास आहे की सॅमसन किंवा पंत या दोघांपैकी एकाला संघात स्थान मिळेल, परंतु दक्षिण आफ्रिकेतील अलीकडील कामगिरीच्या आधारे मला वाटतं सॅमसनला संधी मिळावी. ऋषभने ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली असली तरी त्या मालिकेची लांबी लक्षात घेता त्याला थोडी विश्रांती मिळायला हवी.”