Sarfaraz Khan 1st Test Century Record in IND vs NZ match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु येथील पहिल्या कसोटीत मधल्या फळीतील फलंदाज सर्फराझ खानने दमदार शतक झळकावले. सर्फराझने या सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात वादळी शतक झळकावले. त्याने कठीण परिस्थितीत भारतीय संघासाठी शतकी खेळी साकारली. त्याने शनिवारी सकाळी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ११० चेंडूत शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे. त्याचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. सर्फराझने फेब्रुवारी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

एकाच कसोटीत एखादा फलंदाज शून्यावर बाद होण्याची आणि शतक झळकावण्याची ही २२ वेळ आहे. अलीकडेच गेल्या महिन्यात चेन्नईत बांगलादेशविरुद्ध असे दृश्य पाहायला मिळाले होते. त्या कसोटीत शुबमन गिल पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा सर्फराझ हा दुसरा भारतीय ठरला आहे. शिखर धवनने २०१४ मध्ये ऑकलंडमधील ईडन पार्क येथे टीव्ही संघाविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर ११५ धावा केल्या होत्या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सर्फराझने टिम साऊदीविरुद्ध चौकार मारून पूर्ण केले शतक –

२६ वर्षीय सर्फराझने शुक्रवारी विराट कोहली (१०२ चेंडूत ७०) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली बाद झाल्यानंतर ही भागीदारी मोडली. सर्फराझने चौथ्या दिवशी ७० धावांवरुन डावाला सुरुवात केली आणि वेगवान धावा करत शतक झळकावले. त्याने ९०.९ च्या स्ट्राइक रेटने पहिले कसोटी शतक झळकावले. सर्फराझने टिम साऊदीविरुद्ध चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खान शतकापूर्वी लाइव्ह सामन्यात का नाचू लागला? असं काय झालं? पाहा VIDEO

सर्फराझ खानने पहिले शतक पूर्ण करताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने शतकानंतर धावत मैदानाला राऊंड मारला. त्यानंतर क्रीजवर उपस्थित असलेल्या ऋषभ पंतने त्याची गळाभेट घेतली. भारतीय ड्रेसिंग रूममध्येही जल्लोष पाहिला मिळाला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया केवळ ४६ धावांवर गारद झाली होती, ज्यामध्ये पाच खेळाडूंना खातेही उघडता आले नव्हते. मात्र, भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. यशस्वी जैस्वालने ३५ आणि कर्णधार रोहित शर्माने ५२ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७० धावांची खेळी साकारली.

Story img Loader