Shardul Thakur Turmeric ceremony: सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय क्रिकेटपटूही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत (Indian Cricketers Wedding) आणि काही बांधले जाणार आहेत. गेल्या महिन्यात, केएल राहुल आणि अक्षर पटेलचे लग्न झाले आणि आता शार्दुल ठाकूर लग्नाचे सात फेरे घेण्यास सज्ज झाला आहे. शार्दुल त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकर सोबत २७ फेब्रुवारीला लग्न करणार आहे. त्या अगोदर दोघांचा हळदी समारंभ पार पडला. मिताली परुलकर ही व्यवसायाने बिझनेस वुमन आहे.

हळदी समारंभाचे फोटो व्हायरल –

शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या हळदी समारंभाचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यामध्ये शार्दुल आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी त्याने जोरदार डान्सही केला. शार्दुलच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शार्दुल ठाकूरची भावी पत्नी कोण आहे?

शार्दुल ठाकूरच्या भावी पत्नीचे नाव मिताली परुलकर आहे. मिताली व्यवसायाने एक व्यावसायिक महिला असून ती ‘ऑल जॅझ लक्झरी बेकर्स’ नावाचा स्टार्टअप चालवते. फेब्रुवारी २०२० मध्ये, मिताली परुलकरने तिची स्वतःची बेकिंग कंपनी सुरू केली आणि तेव्हापासून ती बेकरी आणि तिची वेबसाइट या दोन्हीची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांची कंपनी, ऑल जॅझ लक्झरी बेकर्स, विविध प्रकारचे केक, कुकीज, ब्रेड आणि बन्स विकण्यात खूप यशस्वी आहे.

तिचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, मिताली सीएस देखील होती. तसेच तिने ब्लू स्टार डायमंड्स, चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड आणि जेएसडब्ल्यूसारख्या अनेक नामांकित कंपन्यांसाठी काम केले आहे. ती मिठीभाई कॉलेजची पदवीधर आहे.

हेही वाचा – Sarah Taylor: ‘होय, मी लेस्बियन आहे…’, विराट कोहलीला प्रपोज करणारी महिला क्रिकेटर ट्रोलर्सवर भडकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जोडप्याने काही काळ डेट केले आणि नंतर २१ नोव्हेंबर रोजी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एका समारंभात साखरपुडा केला होता. या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुमारे ७५ विशेष पाहुण्यांना बोलावण्यात आले होते, ज्यात रोहित शर्मा, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर या नावांचा समावेश होता. ३१ वर्षीय शार्दुल ठाकूरबद्दल बोलायचे, तर त्याने आतापर्यंत ८ कसोटी, ३४ वनडे आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ५० आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण ३३विकेट्स घेतल्या आहेत.