Shivraj Rakshe अहिल्यानगरची दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी गेले चार दिवस माती आणि गादी विभागातला वेगवेगळ्या गटातल्या कुस्तीचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींना अनुभवला, पण शेवटच्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक होतंय. मॅट विभागातली अंतिम फेरी सुरु होती. ज्यामध्ये नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीची लढत रंगली होती, पण पृथ्वीराज मोहोळनं अवघ्या काही मिनिटात शिवराजला चितपट केलं. पण पंचांचा हा निर्णय शिवराजला रुचला नाही. त्यानं थेट या निर्णयाविरोधात आव्हान दिलं. पण पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. शिवराजनं पंचांना या याचा जाब विचारला, मात्र रागाच्या भरात त्यानं थेट पंचांची कॉलर पकडली, आणि मग लाथ मारली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

शिवराज राक्षेचा आरोप काय?

शिवराज राक्षेनं याआधी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलीये. आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी जाणूनबुजून आपल्याविरोधात निर्णय दिल्याचा आरोप राक्षेने केला. तसंच शिवराजच्या आईने पंचांनी जाणूनबुजून त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच या प्रकरणात पंचांवर कारवाई केली जावी अशीही मागणी केली आहे.

शिवराज राक्षेच्या आईने नेमकं काय म्हटलं आहे?

“पंचांनी माझ्या मुलाला आदल्या दिवशी शिवीगाळ केली होती. तसंच माझ्या मुलावर जर निलंबनाची कारवाई केली तर मग पंचांवर कारवाई का नाही? पंचांना शिक्षा का केली जात नाही? आमचा मुलगा गरीब घरातला आहे. पंचांनी रिप्ले का दाखवला नाही? चूकही मान्य केली पण ती नंतर मान्य केली. माझ्या मुलाचं इतकंच म्हणणं होतं की रिप्ले दाखवा. तो दाखवला नाही. पंचांनी शिवीगाळ करणं किती बरोबर आहे? तीन वर्षे जर त्याचं निलंबन केलं आहे तर मग पंचावर कारवाई केली पाहिजे त्यांचीही चूक आहेच. मागच्या वर्षीही शिवराज राक्षेवर अन्यायच करण्यात आला. हे नेहमी घडत आलं आहे”, असं शिवराज राक्षेच्या आईने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवराज राक्षेंच्या वहिनी काय म्हणाल्या?

“आम्ही कुटुंब म्हणून शिवराज राक्षेंच्या बाजूने उभे आहोत. पंचांनी शिवराज राक्षेंना टार्गेट केलं. दोन दिवस मॅटवर जाण्याच्या आधी शिवी दिली गेली. आता पंचांवर कारवाई का केली गेली जात नाही?” असं शिवराज राक्षेंच्या वहिनीने म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना या भावना शिवराज राक्षेंच्या कुटुंबाने व्यक्त केला.