अहमदाबाद : ‘आयपीएल’मध्ये अनेक अनुभवी खेळाडूंबरोबर खेळल्याचा मला कारकीर्दीत फायदाच झाला, असे भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गिलने सांगितले.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ा पुन्हा मुंबई इंडियन्सकडे गेल्यानंतर संघाने गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. ‘‘कर्णधारपद ही एक जबाबदारी आहे. वचनबद्धता, शिस्त, कठोर मेहनत आणि निष्ठा या सगळय़ा गोष्टी कर्णधारपदाबरोबर जोडल्या जातात. त्या पूर्ण करणे किंवा त्यात खरे उतरणे महत्त्वाचे असते. आजपर्यंत अनेक दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो, त्याचा मला फायदाच झाला. आता हाच अनुभव या वेळी कर्णधारपद सांभाळताना कामी येईल,’’ असे गिल म्हणाला.