Scott Boland Clean Bold Shubman Gill Video Viral : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. दोन दिवसांच्या खेळीनंतर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरल्यानंतर सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या फलंदाजीवर लागल्या होत्या. परंतु, रोहित शर्मा १५ धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कांगारुंचा समाचार घेण्यासाठी शुबमन गिल मैदानात उतरला.
गिल १३ धावांवर खेळत असताना कमिन्सच्या गोलंदाजीवर मिड विकेटवरून चौकार ठोकला. त्या शॉटनंतर गिलचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर तो मोठी खेळी खेळेल असं अनेकांना वाटलं असेल. परंत, करिअरचा आठवा कसोटी सामना खेळणाऱ्या स्कॉट बोलॅंडने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला आणि गिलने तो चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू स्टंपच्या दिशेनं फिरला आणि गिल क्लीन बोल्ड झाला. बोलॅंडच्या चेंडूवर गिलचा त्रिफळा उडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
भारताने टी ब्रेकआधी पहिल्या १० षटकात ३७ धावा फलकावर लागल्या असताना कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि शुबमन गिल (१३) धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केलं. तर तर गिल स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या पहिल्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतल्यानं विराट कोहलीने त्या चेंडूवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं गेला आणि विराट झेलबाद झाला.