Sourav Ganguly Prediction on World Cup Semi Final 20223: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत सलग ४ सामने हरल्यानंतर पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन केले आहे. गुणतालिकेत हा संघ पाचव्या स्थानावर असून अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ विश्वचषकातून बाहेर पडावेत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल हे काही दिवसांनंतरच ठरेल. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडतील, अशी आशा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे.

स्पोर्ट्स तकशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “मला आशा आहे की पाकिस्तान संघ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना विश्वचषकातील सर्वात मोठा सामना असेल.” याशिवाय गांगुलीने विराट कोहलीचे कौतुक केले. तो म्हणाला की, “विराट कोहली निःसंशयपणे महान खेळाडूंपैकी एक आहे. ईडन गार्डनस येथे त्याचे ४९ वे शतक पाहणे खूप छान वाटले. विशेषत: गेल्या अनेक सामन्यांमध्ये तो या विक्रमाची बरोबरी करण्यास मुकला होता.”

पाकिस्तान कसा पोहोचेल उपांत्य फेरीत?

नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. अशा परिस्थितीत केवळ विजयाची नोंद केल्याने त्यांचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होणार नाही. सध्या पाकिस्तानचा नेट रन रेट ०.०३६ आहे, तर न्यूझीलंडचा नेट रनरेट ०.३९८ आहे. आता पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. कारण जर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध १ धावानेही विजय मिळवला, तर पाकिस्तानला १३० धावांनी विजय मिळवावा लागेल. श्रीलंकेविरुद्धचा सामना किवीज हरला तर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल. दोन्ही संघ जिंकल्यास उपांत्य फेरीचे तिकीट कोणाला मिळणापर हे नेट रनरेटनुसार ठरेल.

हेही वाचा – ENG vs NED, World Cup 2023: जो रुट विचित्र पद्धतीने ‘क्लीन बोल्ड’ झाल्याने चाहत्यांनी धरलं डोकं, VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तानसाठी काय आहे उपांत्य फेरीचे समीकरण?

जर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ पुढील सामन्यात पराभूत झाले आणि अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पुढील सामना जिंकला, तर अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. मात्र, कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. याचा निर्णय ११ नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यातील निकालावरुन ठरणार आहे.