भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशनला संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी शुबमन गिलला संधी देण्यात आली होती. यावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहितच्या या निर्णयाला समर्थने दिले. त्यानंतर सौरव गांगुलीने विराट आणि सचिन तेंडुलकरच्या तुलनेवर मोठे वक्तव्य केले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ११३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. या खेळीसाठी विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एकदिवसीय सामन्यातील विराटचे हे ४५ वे शतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. विराटचे ४५ वे वनडे शतक असल्याने त्याची तुलना सचिनशी केली जात आहे. या वादावर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw: ही आहे पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड? हार्टचा इमोजी टाकत स्टोरी शेअर केल्याने चाहत्यांमध्ये एकच चर्चा

जेव्हा गांगुलीला विराट विरुद्ध सचिन वादावर भाष्य करण्यास विचारण्यात आले, तेव्हा तो पीटीआयला म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण आहे. विराट कोहली महान खेळाडू आहे. त्याने अशा अनेक डाव खेळले आहेत, ४५ शतके अशीच होत नाहीत. ती एक विशेष प्रतिभा आहे.” पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ८७ चेंडूत ११३ धावांची संस्मरणीय खेळी केली.

हेही वाचा – ODI WC Final 2011: ‘२०११च्या फायनलमध्ये धोनीने मला शतक…’, गौतम गंभीरचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने पहिल्या सामन्यात ७ विकेट गमावून ३७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने ५० षटकांत आठ गडी गमावून ३०६ धावा केल्या होत्या. भारताने पहिला सामना ६७ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.