एकदिवसीय विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. २०११च्या विश्वचषकातील शानदार विजयाची कहाणी असंख्य वेळा सांगितली गेली आणि पुनरावृत्ती झाली. तरीही, चाहत्यांना या विश्वचषकाबद्दल अनेकदा ‘कधीही न ऐकलेल्या’ गोष्टी ऐकायला मिळतात. आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने स्वत: धोनीबाबतचा एक महत्वाचा खुलासा केला.

हा खुलासा गंभीरने मंगळवारी केला. गौतम गंभीर म्हणाला की, टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनीने त्याला अंतिम सामन्यात शतक झळकावण्यासाठी प्रोत्साहित केले होते. गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, गंभीरने खुलासा केला की, धोनीने त्याच्या खेळीसाठी किती योगदान दिले, ज्यामुळे त्याला विक्रमी कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळाले.

Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

गौतम गंभीर म्हणाला, “एमएस धोनी खूप मदत मदतनीस होता. कारण मी शतक करावे अशी त्याची इच्छा होती. मी शतक झळकावे अशी त्याची नेहमीच इच्छा होती. त्याने मला षटकांमध्‍येही सांगितले होते की ‘तुझे शतक पूर्ण कर, तुला हवा तेवढा वेळ घे आणि घाई करू नको. गरज पडल्यास मी धावांची गती वाढवू शकतो.”

हेही वाचा – Rahul Dravid Birthday: ‘या रिपोर्टरला बाहेर काढा…’, जेव्हा पाकिस्तानात संतापला होता द्रविड, जाणून घ्या किस्सा

श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला २७५ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर भारताने सलामीवीर वीरेंद्र सेहवागला धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच चेंडूवर गमावले. तसेच लसिथ मलिंगाने धोकादायक सचिन तेंडुलकरला देखील १८ धावांवर बाद केले. ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: सूर्यकुमार यादवच्या प्रश्नांना विराटने दिलं मजेशीर उत्तर, विश्वचषकाबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट, पाहा VIDEO

त्यानंतर गंभीरला युवा विराट कोहलीची मदत मिळाल्याने विकेट्सचा प्रवाह रोखण्यात यश आले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली देखील बाद झाला. तरीही न डगमगता गंभीरने आणखी एक भागीदारी रचली. त्याने यावेळी धोनीसोबत गेम चेंजिंग १०९ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, गंभीर ९७ धावांवर बाद झाल्याने धोनीसोबतची त्याची भागीदारी संपुष्टात आली. त्याला मध्यमगती गोलंदाज थिसारा परेराने क्लीन बोल्ड केले हो.

अखेरीस गंभीर ९७ धावांवर बाद झाला. त्यामुळे युवराज सिंगने धोनीसोबत मिळून फिनिशिंग टच दिला. ज्यामध्ये धोनीने त्याच्या नाबाद ९१ धावा करताना लॉंग-ऑन वर विजयी षटकार लगावला आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला. तसेच दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली.