Sikandar Raza All Time Great T20 Playing XI: भारतीय संघात सध्या मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि टी-२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वनडे संघात रोहित शर्माला स्थान दिलं गेलं आहे. पण त्याचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे तो फक्त सलामीवीर फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. रोहित आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला कमी झालेला नाही. झिम्बाब्वेच्या स्टार खेळाडूने रोहित शर्माची ऑलटाइम ग्रेट टी -२० संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे.

या दिग्गज खेळाडूंना दिलं स्थान

सिकंदर रजाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांची निवड केली आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने निकोलस पूरनची निवड केली आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचे स्टार फलंदाज एबी डिविलियर्स आणि हेनरिक क्लासेनला देखील संघात स्थान दिलं आहे. वेस्टइंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

यासह अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी आणि रवींद्र जडेजाची निवड केली आहे. फिरकी गोलंदाज म्हणून त्याने राशिद खानची निवड केली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क आणि शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार पुनरागमन

रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. रोहित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याने टी – २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

अशी आहे सिकंदर रजाने निवडलेली ऑल टाइम ग्रेट टी -२० इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस गेल, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), एबी डिविलियर्स, हेनरिक क्लासेन, कायरन पोलार्ड, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, शाहीन शाह आफ्रिदी, मिचेल स्टार्क.