Dinesh Karthik on KL Rahul: सध्या केएल राहुल त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या १० कसोटी डावांपैकी एकाही डावात त्याला २५ धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. केएलला त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. दरम्यान, केएल राहुलसोबत क्रिकेट खेळलेला टीम इंडियाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक या फलंदाजाबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

मला केएल राहुलचे वाईट वाटते –

कार्तिक म्हणाला की त्याला केएल राहुलबद्दल वाईट वाटले. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात तो एक धाव काढून बाद झाला. तिथे त्याने काहीही चूक केली नाही. त्याने बॅक-ऑफ-ए-लेन्थ डिलीव्हरी मजबूतपणे फ्लिक केली पण तो झेलबाद झाला. कार्तिक म्हणाला, जर राहुलला १ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंदूर कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, तर त्याचे कारण एका दुर्दैवी विकेटच्या नुकसानामुळे नसेल, तर गेल्या वर्षीच्या दक्षिण आफ्रिका मालिकेपासून सुरु असलेली त्याच्या खराब कामगिरीमुळे असेल.

तो एक क्लास खेळाडू आहे –

कार्तिक क्रिकबझवरशी बोलताना म्हणाला, “तो एक क्लास खेळाडू आहे. तो सर्व फॉरमॅटमध्ये चांगला आहे. या टप्प्यावर तंत्रज्ञानाचा अभाव आहे असे मला वाटत नाही. त्याला खेळापासून काही काळ दूर राहण्याची गरज आहे. ज्यामुळे तो एकदिवसीय सामन्यांमध्ये नव्याने पुनरागमन करू शकेल.” राहुलच्या परिस्थितीबद्दल स्वतःचे उदाहरण देत कार्तिक म्हणाला, “हे एक व्यावसायिक जग आहे. तुम्हाला त्या दुःखाच्या क्षणांना सामोरे जावे लागेल. पण एक खेळाडू म्हणून मी बघू शकतो की तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती असते की ही तुमची शेवटची खेळी असू शकते.”

हेही वाचा – Womens T20 WC 2023: पाकिस्तानच्या दारुण पराभवामुळे भारताचं मोठं नुकसान; फायनलमध्ये जाण्यासाठी द्यावी लागणार अग्निपरीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉयलेटमध्ये जाऊन अश्रू गाळावे लागतात –

कार्तिक पुढे म्हणाला, “माझ्यासोबतही असे घडले आहे. जेव्हा तुम्ही बाद होता आणि ड्रेसिंग रूममध्ये पोहोचता, तेव्हा तुम्ही शांतपणे टॉयलेटमध्ये जाऊन एक किंवा दोन अश्रू गाळता. ही चांगली भावना नाही. कारण तुम्ही त्याबद्दल फार काही करू शकत नाही.” कार्तिक शुबमनबद्दल म्हणाला, “सध्या मला शुबमन गिलसोबत जावे लागेल. त्याने चांगली फलंदाजी केली आहे. भारत इलेव्हनमध्ये फक्त एक बदल करेल. मला केएल राहुलचे वाईट वाटते. तो प्रश्नांच्या घेऱ्यात आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की, केएल जोरदार पुनरागमन करेल. त्याच्यासारखे उजव्या हाताचे फलंदाज फारसे नाहीत, जे त्याच्याशी गुणवत्ता आणि शॉट्सच्या श्रेणीत बरोबरी करू शकतील.”