Sunil Gavaskar Warns Team India Ahead of IND vs BAN Test: भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत इशारा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफीचे आयोजन करणे सुनील गावस्कर यांनी स्मार्ट मुव्ह म्हटले आहे. भारतीय संघ पुढील साडेचार महिन्यात १० कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबत गावस्कर म्हणाले की, भारताला किमान ५5 सामने जिंकावे लागतील आणि ते सोपे नसेल.

हेही वाचा – Asian Champions Trophy: अपराजित भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, द. कोरियाचा ४-१ ने पराभव, फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाचं आव्हान

दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे गोलंदाज खेळायला हवे होते, असे सुनील गावस्कर यांनी मिड-डेमधील स्तंभात लिहिले आहे, कारण सेकंड स्ट्रिंग गोलंदाजांविरुद्ध कोण चांगला फलंदाज आहे हे शोधणे फार कठीण आहे. कारण सर्वोत्तम फलंदाज कोण हे निवडकर्त्यांना कळणार नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत हे लक्षात ठेवा. सिराज आणि जडेजा यांना नंतर संघातून रिलीज करण्यात आले. तर अश्विन आणि बुमराह यांची निवड केली नाही. मोहम्मद शमी दुखापतीतून सावरत आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir: “संतापलेला गौतम गंभीर ट्रकवर चढला अन् चालकाची कॉलर पकडून..”, माजी खेळाडूने सांगितला गंभीरच्या भांडणाचा प्रसंग

दुलीप ट्रॉफीचे आयोजन स्मार्ट मुव्ह

सुनील गावस्कर यांनी लिहिले, “बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दुलीप ट्रॉफीचे आयोजन करणे हे बीसीसीआयने उचललेले सर्वोत्तम पाऊल आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठीही तयारीशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाणे सोपे नसते, मग विरोधी संघ कोणीही असो. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेश संघाने दाखवून दिले आहे की ते काय करू शकतात. काही वर्षांपूर्वी भारताने बांगलादेशचा दौरा केला तेव्हाही बांगलादेशी खेळाडूंनी त्यांना कडवी टक्कर दिली.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

बांगलादेशला साधारण संघ समजून चालणार नाही

सुनील गावस्कर यांनी पुढे लिहिले की, “आता पाकिस्तानविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर ते भारताचा सामना करण्यास तयार आहेत. त्यांच्याकडे काही उत्कृष्ट खेळाडू आणि काही नवीन खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना विरोधी संघाची भिती वाटत नाही. आता त्यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या प्रत्येक संघाला हे माहीत आहे की त्यांना साधारण समजू शकत नाही, अन्यथा पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ शकते. ही मालिका खूपच उत्सुकतेने भरलेली असणार आहे.”

हेही वाचा – Younis Khan: “खेळण्यापेक्षा बडबडच जास्त…”, बाबर आझमला सुनावताना पाकिस्तानच्या युनूस खानने विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे लिटील मास्टर खेळाडू म्हणाले, “भारताला पुढील साडेचार महिन्यांत १० कसोटी सामने खेळायचे आहेत आणि जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी टीम इंडियाला किमान पाच सामने जिंकावे लागतील. यापैकी कोणताही कसोटी सामना सोपा असणार नाही आणि त्यामुळे आम्ही काही रोमांचक क्रिकेट खेळू शकू. दुलीप ट्रॉफी ही एक अशी स्पर्धा होती ज्याने निवडकर्त्यांना खेळाडूंबद्दल बरीच माहिती दिली आणि खेळाडूंना हे देखील माहित होते की जर त्यांनी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर त्यांची भारतासाठी निवड होण्याची शक्यता वाढेल.