Sunil Gavaskar Statement: भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकापेक्षा एक विक्रमांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा सुनील गावसकर हा जगातील पहिला फलंदाज होता, त्यानंतर त्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर भारतीय क्रिकेटला विराट कोहलीसारखा स्टार मिळाला, ज्याने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७४ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.

सुनील गावसकर हे आजही अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहेत. सध्याच्या काळातील अनेक दिग्गज खेळाडूही त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. पण गावसकर यांचा आवडता खेळाडू किंवा त्यांचा हिरो कोण? याचा खुलासा भारताच्या या माजी कर्णधाराने केला आहे. गावसकरांचा हिरो क्रिकेटपटू नसून देशातील बॅडमिंटनचा नवा स्टार लक्ष्य सेन आहे. गावसकर यांनी इंस्टाग्रामवर लक्ष्यासोबतचा एक फोटो शेअर करून याचा खुलासा केला आहे. गावसकर एका बैठकीसाठी बंगळुरूला गेले तेव्हा ते प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत पोहोचले, जिथे त्यांना त्यांच्या नवीन नायकाची भेट झाली.

सुनील गावसकर यांनी या दिग्गजांना आपला सर्वात मोठा हिरो सांगितला

भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी आता आपल्या सर्वात मोठ्या हिरोचे नाव जगासमोर उघड केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील गावसकर यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या स्टार्सनासुद्धा काही सांगितले नाही तू माझा मोठा हिरो आहे. ७३ वर्षाचे सुनील गावसकर भारताच्या १९८३च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाचे सदस्य, गुरुवारी बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (PPBA) येथे पोहोचले.

हेही वाचा: IND vs AUS: “कांगारूंना स्लेजिंगशिवाय दुसरं येतंच काय?” आर. अश्विनचा ऑस्ट्रेलियन संघावर घणाघात, सराव सत्रात स्मिथला फुटला घाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील गावसकर यांनी अचानक हा मोठा निर्णय घेतला

सुनील गावसकर जेव्हा बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (PPBA) मध्ये तरुण खेळाडूंना भेटण्यासाठी आले तेव्हा लक्ष्य सेनचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पीपीबीएचे सह-संस्थापक, संचालक आणि मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, “त्यांनी (गावसकर) बेंगळुरू येथे एक बैठक घेतली आणि अकादमीच्या तरुण होतकरू मुलांना भेटण्याचा निर्णय घेतला. बॅडमिंटन आणि क्रिकेट हे त्याचे दोन आवडते खेळ. सुमारे तासभर ते आमच्यासोबत इथे गप्पा मारत होते.” गावसकर यांनी नंतर लक्ष्य सेनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, “लक्ष्य सेन, प्रकाश पदुकोणनंतरचा माझा नवा बॅडमिंटन हिरो.”