Sunil Gavaskar Prediction on Indian captaincy: भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी हार्दिक पांड्याबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. गावसकर यांच्या मते भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करण्याचा दावा करण्यासाठी हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वनडे सामना जिंकावा लागेल. कारण पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे संघाचा भाग असणार नाही. त्यामुळे या सामन्यात हार्दिक पांड्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

२९ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आयपीएल २०२२ च्या मोसमात नवोदित गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले. त्याचबरोबर या संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. गावस्कर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ला सांगितले की, “गुजरात टायटन्स आणि त्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी त्याच्या कर्णधारपदाने मी खूप प्रभावित झालो आहे. मला विश्वास आहे की, जर त्याने मुंबईतील पहिला सामना जिंकला, तर २०२३ मध्ये विश्वचषक संपल्यानंतर तुम्ही भारताच्या कर्णधारपदासाठी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकता.”

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Stuart Broad Believes Rishabh Pant Should be Indias wicketkeeper batsman in world cup squad
IPL 2024: “त्याचा शॉट पाहून मला वाटलं तो T20 WC संघात असेल”, स्टुअर्ट ब्रॉड ‘या’ भारतीय खेळाडूमुळे झाला प्रभावित!

गावसकर म्हणाले की, मधल्या फळीत पांड्याची उपस्थिती भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. ते म्हणाले, “तो मधल्या फळीतील ‘इम्पॅक्ट आणि गेम चेंजर’ खेळाडू असू शकतो. गुजरात संघासाठीही तो आवश्यकतेनुसार फलंदाजीसाठी क्रमवारीत यायचा.”

हेही वाचा – IPL 2023: आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू खेळाडूची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘एका षटकात लगावणार चार षटकार’

माजी अनुभवी सलामीवीर म्हणाला, “तो एक असा खेळाडू आहे, जो जबाबदारी घेण्यास तयार आहे. समोरून संघाचे नेतृत्व करतो. तो इतर खेळाडूंना असे काही करण्यास सांगणार नाही, जे त्याला स्वतःला करायचे आहे. तो या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.” गावसकर म्हणाले की, पांड्याच्या कर्णधारपदाची शैलीही त्याला इतर खेळाडूंमध्ये वेगळे बनवते.

गावसकर पुढे म्हणाले, “तुम्ही पाहिले असेल की कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या इतर खेळाडूंना आरामात ठेवतो. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवून तो परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळतो.”

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.