टीम इंडियाचा गुरुवारी (१० नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास आज इथेच संपला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर १३० कोटी भारतीय जनतेची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेचं नाराज असल्याचे पाहायला मिळाले. याला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील अपवाद नव्हता.अशात आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगचे भारतीय संघाबाबत वक्तव्य चर्चेत आहे. हरभजन सिंग याने हे वक्तव्य टी२० क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या फ्लॉप कामगिरीवरून केले आहे.

भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना हटवण्याची मागणी होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही या यादीत सामील झाला आहे. हरभजन सिंगने कर्णधार आणि प्रशिक्षकाऐवजी २ नवीन खेळाडूंची नावे सुचवली आहेत. इंडिया टुडेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “राहुल द्रविडच्या जागी आशिष नेहरासारखा कोणीतरी यायला हवा. नुकताच टी२० क्रिकेटमधून निवृत्त झालेला आशिष नेहरा माझा आवडता प्रशिक्षक असेल. रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला संधी द्यावी, असे मला वाटते. तो या फॉरमॅटमध्ये अधिक प्रभावी ठरेल.

हेही वाचा :  ‘बिलियन डॉलर लीग क्रिकेटर खेळणारा संघ मागे राहिला…’ रमीज राजाने टीम इंडियाची उडवली खिल्ली 

तुम्हाला सांगतो की हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीने यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात गुजरात टायटन्ससाठी विजेतेपद पटकावले होते. आयपीएल २०२२ साठी नेहरा गुजरात टायटन्समध्ये सामील झाला. गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात विजेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम त्याने केला.

हेही वाचा :   टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडला विश्रांती, हा दिग्गज न्यूझीलंड दौऱ्यावर असणार टीम इंडियाचा प्रशिक्षक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरभजन सिंगनंतर भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनीही पांड्याला टी२० क्रिकेटचा पुढचा कर्णधार मानलं आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याच्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर त्याने पुढील कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा निर्णय घेतला असता. भविष्यात पंड्या निश्चितपणे संघाची धुरा सांभाळेल आणि काही खेळाडू निवृत्त होतील, तुम्ही काही सांगू शकत नाही. खेळाडूंनी यावर खूप विचार केला पाहिजे.