टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला ५ गडी आणि एक षटक राखून मात दिली. या विजयानंतर न्यूझीलंड टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा पोहोचला आहे. यापूर्वी २००७ आणि २०१६ च्या उपांत्य फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्याचबरोबर २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत मिळालेल्या पराभवाचा हिशोबही चुकता करता आला. उपांत्य फेरीत जिमी निशमची बॅट चांगलीच तळपली होती. त्याच्या आक्रमक खेळीमुळे धावा आणि चेंडूमधील अंतर कमी झालं होतं. जिम्मी ११ चेंडूत २७ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत निशम खेळपट्टीवर होता. आता इंग्लंडला पराभूत केल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. आता जिम्मी निशमचं जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. “मुलांनो, खेळ करू नका. बेकिंग किंवा काहीतरी घ्या. ६० व्या वर्षी खरोखरच लठ्ठ आणि आनंदी व्हा”, असं ट्वीट निशमने इंग्लंड विरुद्धचा अंतिम सामना गमवल्यानंतर केलं होतं. १५ जुलै २०१९ रोजी सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी त्याने हे ट्वीट केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आणखी एक सुपर ओव्हर करण्याच निर्णय झाला. मात्र ही सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली आणि इंग्लंडला चौकारांच्या मदतीने विजयी घोषित करण्यात आलं. २०१९ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पराभव, २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजय आणि आता टी २० वर्ल्डकपची अंतिम फेरीत प्रवेश असा प्रवास गेल्या दोन वर्षात न्यूझीलंड संघाने केला आहे. रविवारी टी २० वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्यास एका वर्षात दोन आयसीसी स्पर्धा जिंकण्याची अनोखी संधी असणार आहे.