टी२० विश्वचषक २०२२ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने सोमवारी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. दुसरीकडे, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे ३ महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला गडी बाद करता आला नाही. म्हणजेच त्याचे पुनरागमन कमी होते. त्यामुळे पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाला. दुसरीकडे नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन चांगलेच महागात पडले.

आता शाहीन आफ्रिदी आणि भारतीय वेगवान गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. यामध्ये आफ्रिदी शमीकडून टिप्स घेताना दिसला. गोलंदाजी सुरू केल्यापासून तो या भारतीय दिग्गजांना फॉलो करत असल्याचेही त्याने सांगितले.

विशेष म्हणजे दुखापतीतून सावरल्यानंतर शाहीन टी२० विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला होता. यामुळे तो आशिया कपमध्ये खेळला नाही. दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यानंतर शमीचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर तो टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी२० मालिकेत त्याची निवड झाली होती, पण कोरोनामुळे तो खेळू शकला नाही.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: हॅरी ब्रूकच्या विस्फोटक खेळीने इंग्लंडचा पाकिस्तानवर सहा गडी राखत दणदणीत विजय 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांमधील झालेलं संभाषण

शाहीन आणि मोहम्मद शमी नेट सेशन म्हणजेच सराव सत्रादरम्यान बाहेर भेटले. यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज म्हणाला, “शमी भाई कैसे हो आप” अशी विचारणा केली. “जेव्हापासून मी गोलंदाजी सुरु केली तेव्हापासून तुला फॉलो करत आहे. तुमची मनगटाची ताकद आणि गती अगदी बरोबर लक्षात ठेवले. खरंतर तुमच्याकड असणारी प्रतिभा हे त्यामागचे खर उत्तर आहे.” शमीने शाहीनच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. शमी त्याला टिप्स देताना म्हणाला की, “जर रिलीज पॉइंट चांगला असेल तर सीम पण ठीक होईल.”