Team India Playing XI Against UAE: आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १५ सदस्यीय संघात शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांना पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. गिल उपकर्णधार म्हणून संघात परतला आहे. तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव देखील टी-२० संघात परतला आहे. आशिया चषक स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
या स्पर्धेत उपकर्णधार शुबमन गिल आणि टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो. तर संजू सॅमसन किंवा तिलक वर्मा या दोघांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलचा संघात समावेश केला जाऊ शकतो. शिवम दुबेला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यााठी वाट पाहावी लागू शकते. कारण त्याच्या जागी रिंकू सिंगला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. यासह या संघात २ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघाचा आशिया चषक २०२५ स्पर्धेतील पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरूद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये ७ फलंदाजांजा समावेश केला जाऊ शकतो. तर २ फिरकी आणि २ वेगवान गोलंदाजांना या संघात स्थान दिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. तर वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव दोघेही प्रमुख फिरकी गोलंदाजांच्या भूमिकेत असतील. त्यांना साथ हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा हे देखील गोलंदाजी करू शकतात.
यूएईविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती