Rohit Sharma Press Conference : आतापर्यंत फक्त ६ कसोटी सामन्यात नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने अहमदाबाद कसोटी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. रोहित म्हणाला, दिर्घकाळ नेतृत्व करण्याचे गुण मिळवण्यासाठी मी अजूनही शिकत आहे. मला गोष्टी सरळ मार्गाने करायच्या आहेत. लोकांचं लक्ष्य वेधण्यासाठी वेगळं काही करायचं नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला चौथा सामना अनिर्णीत ठरल्यानंतर रोहितला कर्णधारपदाबाबत भाष्य करण्यासाठी सांगितल्यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. रोहितने म्हटलं, चार कसोटी सामने पूर्ण करण्यासाठी विश्लेषण कशाला? नागपूरपासून इथपर्यंत कसोटी सामन्यातं नेतृत्व करत आलो आहे.

रोहितने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, “ज्या सामन्यांमध्ये मी नेतृत्व केलं आहे, त्या प्रत्येक सामन्यांतून कर्णधाराच्या रुपात मी अजूनही शिकत आहे. कसोटीच्या तुलनेत मी टी २० क्रिकेटमध्ये अधिक नेतृत्व केलं आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाबाबत मला फक्त सहा सामन्यांचा अनुभव आहे. मी अजूनही शिकत आहे. माझ्या सहकाऱ्यांनी खूप क्रिकेट खेळलं आहे आणि ते मला सहकार्य करतात.”

नक्की वाचा – WTC Final 2023: …म्हणून टीम इंडिया पोहोचली WTC फायनलमध्ये, हा Video पाहून तुमचीही धडधड वाढेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेतृत्व करण्यासाठी प्रभावी मार्ग कोणता? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित म्हणाला, “जेव्हा मी संघाचं नेतृत्व करतो, तेव्हा अनेक गोष्टी सरळ मार्गात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी अनोखा प्रयोग किंवा काहीतरी वेगळं करण्याच प्रयत्न करत नाही . खेळ दिर्घकाळ सुरु राहणारं असल्याने तुम्हाला धीर ठेवण्याची आवश्यकता असते.” रोहित पुढे म्हणाला, “तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम होण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला मैदानात शांत राहावं लागतं. जेव्हा मी संघाचं नेतृत्व करतो, तेव्हा मी या सर्व गोष्टींबाबत विचार करतो. “