आज होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरमध्ये गेले दोन-तीन दिवस खूप पाऊस पडतो आहे. आजही सकाळपासून ढगाळ हवामान आहे. नागपुरात तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्यामुळे विदर्भासह शेजारील राज्यातील आणि जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, शुक्रवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते आणि पावसाच्या अधून-मधून रिमझिम सरी देखील बरसत होत्या. त्यामुळे दोन्ही संघांनी सराव केला नाही.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ड्रेनेजची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. जामठा येथील मैदानावर पहिले ती अतिशय खराब होती. पण या नवीन स्टेडियममध्ये मात्र चांगली सुविधा आहे. कितीही पाऊस आला तरीही १५ ते२० मिनिटांत सामना सुरु होऊ शकतो. पावसामुळे मैदान खराब होऊ नये यासाठी मैदानभर कव्हर टाकण्यात आले आहे. पावसाने उसंत घेतली तर विनाअडथळा सामना खेळवला जावा, याची संपूर्ण तयारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने केली आहे. दरम्यान, शुक्रवारी पावसाचा अंदाज असला तरी सायंकाळी तशी शक्यता फार कमी आहे. पाऊस आला तरी तो थोड्या वेळासाठी असेल, असे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : बुमराबाबत संभ्रम कायम! ; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजयी पुनरागमनाचे भारताचे लक्ष्य 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मोहाली येथे खेळला गेलेला पहिला टी२० सामना ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून जिंकला होता. यामुळे ते तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० ने पुढे आहेत. तसेच दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघात जसप्रीत बुमराह अंतिम अकरामध्ये येण्याची शक्यता आहे.