इंडियन प्रीमियर लीग २०२३ सुरु होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातच खेळाडूंनी त्यांच्या टीमसोबत राहून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलचं १६ वं सीजन ३१ मार्च २०२३ पासून सुरु होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्याआधी आम्ही तुम्हाला अशा चार खेळाडूंबाबत सांगणार आहोत, ज्यांचं करिअर आता संपलं आहे. तिरुमलासेट्टी सुमन या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर फलंदाज तिरुमलासेट्टी सुमनच्या नावाची नोंद आहे. त्याने हैद्राबाद डेक्कन चार्जर्ससाठी मोठी खेळी केली होती. २००९ मध्ये सुमनने आयपीएलमध्ये २३७ धावा केल्या होत्या. २०१० मध्ये त्याने ३०७ धावांची कामगिरी केली होती. पण त्यानंतर सुमनने खराब कामगिरी करत मुंबई इंडियन्ससाठी सात इनिंगमध्ये फक्त ६५ धावा केल्या. या कारणास्तव सुमनला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही संधी मिळाली नाही. कामरान खान वेगवान गोलंदाज कामरान खानला राजस्थान रॉयल्सने वर्ष २००९ मध्ये खरेदी केलं होतं. त्यावेळी कामरानने १४० किमी प्रति तास वेगानं भेदक गोलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली होती. कामरान २०११ मध्ये पुणे टीममध्ये खेळण्यापूर्वी २०१० पर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. पण त्यानंतर कामरानला प्रभावीपणे कामगिरी करता आला नाही. त्यामुळे कामरानला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. नक्की वाचा - …म्हणून एम एस धोनी IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार, ‘या’ लिस्टमध्ये रोहित शर्मा पिछाडीवर, जाणून घ्या यामागचं कारण मोहित शर्मा आयपीएल २०१४ मध्ये मोहित शर्मा परपल कॅप विनर होता. मोहितला एका जमान्यात अप्रतिम गोलंदाज म्हणून ओळखलं जायचं. पण २०१५ मध्ये मोहितला कोणत्याही संघांनी खरेदी केलं नाही. ३३ वर्षीय मोहितला आयपीएल कॉन्ट्र्क्ट मिळालं नाही. मोहितला आयपीएलमध्ये पुन्हा संधी न दिल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटवला होता. मनप्रीत गोनी मनप्रीत गोनीने वर्ष २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. गोनीने २००८ मध्ये आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर टीम इंडियात जागा पक्की केली. परंतु,याचदरम्यान त्याने हॉंगकॉंग आणि बांग्लादेशच्या विरुद्ध एक संधी मिळाली. गोनी हैद्राबाद डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. परंतु, २००८ मध्ये सीएसकेमध्ये संधी मिळाल्यानंतर गोनीला चांगली कामगिरी करता आली नाही.