Most Successful Captain In IPl History : आयपीएलचा १६ वा सीजन अवघ्या तीन-चार दिवसानंतर सुरु होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या ट्रॉफीवर जेतेपदाचं शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वच संघांचे खेळाडू मैदानावर कंबर कसत आहेत. पण आयपीएलच्या इतिहासात महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी आपापल्या संघाचं कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहित शर्माला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखलं जातं. रोहितने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये मुंबई इंडियन्सला सर्वात जास्त ५ जेतेपद जिंकून दिले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जसाठी एम एस धोनीने ४ जेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे.

कर्णधार म्हणून धोनीने जिंकले सर्वात जास्त सामने

महेंद्र सिंग धोनी आयपीएलचं पहिलं सीजन म्हणजेच २००८ पासून चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करत आहे. तर रोहित शर्माने २०१३ पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली आहे. अशातच धोनीने कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या तुलनेत आयपीएलमध्ये अधिक सामने जिंकले आहेत. धोनीने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण २१० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३ सामन्यांत विजय संपादन केलं आहे. तर ८६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णीत घोषीत करण्यात आला. धोनी आयपीएलमध्ये सर्वात जास्त सामने खेळणारा कर्णधार आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्ससाठी नेतृत्व केलं आहे.

नक्की वाचा – IPL History : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी शतक ठोकून रचला इतिहास; ‘या’ फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक शतकांची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकूण १४३ सामने खेळले आहेत. यामध्ये ७९ सामन्यांमध्ये रोहितने विजय मिळवला असून ६० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात जास्त सामने खेळणारा दुसरा कर्णधार आहे. या लिस्टमध्ये विराट कोहली तिसऱ्या, गौतम गंभीर चौथ्या आणि एडम गिलक्रिस्ट पाचव्या स्थानावर आहे.महेंद्र सिंग धोनी आयपीएलच्या इतिहासात १०० हून अधिक सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने हा आकडा गाठलेला नाहीय. यंदाचं आयपीएल सीजन धोनीसाठी शेवटचा असेल, अशी चर्चाही क्रिडाविश्वात रंगली आहे.