India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ओली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंतला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तर प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप आणि ऋषभ पंत यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेल्या ३ खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
मालिकेतील पाचव्या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. यासह संघातील प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर, डॉसन, ब्रायडन कार्स यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे. संघातील प्रमुख खेळाडू बाहेर असले तरीदेखील इंग्लंडला हलक्यात घेऊन लचालणार नाही. इंग्लंडचा संघ मालिका जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसू शकतो.
हे ३ खेळाडू बाकावरच
या मालिकेसाठी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा देखील संघात समावेश करण्यात आला. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. फिरकी गोलंदाजीसाठी पाचव्या कसोटीत त्याला स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा होती. पण त्याला पुन्हा एकदा बाकावर बसवण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे अभिमन्यू ईश्वरनला देखील या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. साई सुदर्शन आणि करुण नायर यांना दोघांना संधी दिली गेली. पण अभिमन्यू ईश्वरन मात्र बाकावरच राहिला.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देखील या मालिकेत एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही. पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण या सामन्यातही प्रसिध कृष्णाला संधी दिली गेल्याने त्याला संघात स्थान दिलं गेलं नाही.
या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल ( कर्णधार) ध्रुव जुरेल, करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप