क्रिकेटपटू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने तिच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम डीलसाठी देण्यात आली होती, मात्र जयाने पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

वृत्तानुसार, दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, पारीख स्पोर्ट्स, हैदराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जयाकडून करारासाठी १० लाख रुपये घेतले होते. जे त्यानी परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.

दीपक चहरचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोवर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. करारानुसार, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जयाकडून १० लाख रुपये घेतले होते, परंतु ते अद्याप परत केलेले नाहीत. इतकंच नाही तर वृत्तानुसार, पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ तर केलीच पण जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.

हेही वाचा – दीपक चहरच्या डोळ्यादेखत माकडाने पळवली भलतीच गोष्ट; VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक चहर हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो आयपीएल संघ सीएसकेचादेखील भाग आहे. त्याला आयपीएल २०२२मध्ये सीएसकेने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पंरतु दीपक दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता