Four Players Smashes Big Centuries In IPL : इंडियन प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज खेळाडू मैदानात उतरले की धावांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. आयपीएलमध्ये लीग सामन्यांप्रमाणे प्ले ऑफ सामन्यातही अनेक विक्रमांना गवसणी घालण्यात आली. पण या नॉकआऊट सामन्यात काही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. आजपर्यंत असा पराक्रम कोणत्याच खेळाडून केला नाहीय. आज आम्ही तुम्हाला अशा ४ फलंदाजांबाबत सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यात शतक ठोकलं होतं.

१) मुरली विजय

Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

चेन्नई सुपर किंग्जच्या सर्वात स्टायलिश फलंदाजांपैकी एक असलेल्या मुरली विजयने आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यात पहिलं शतक ठोकलं होतं. २०१२ मध्ये आयपीएलमध्ये मुरलीने दिल्ली कॅपिटल्स विरोधात दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात ५८ चेंडूत ११३ धावांची शतकी खेळी केली होती. मुरलीने त्याच्या या धमाकेदार इनिंगमध्ये १५ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते. मुरलीच्या या आक्रमक खेळीमुळं सीएसकेने हा सामना ८६ धावांनी जिंकला होता आणि २०१२ च्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.

नक्की वाचा – Sachin Tendulkar: …म्हणून सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हणतात; IPL च्या ‘त्या’ सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

२) वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएल सीजन-७ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात क्वालिफायर २ मध्ये ५८ चेंडूत १२२ धावांची शतकी खेळी केली होती. सेहवागची आयपीएल करिअरमधील ही सर्वोत्तम इनिंग होती. सेहवागने या धडाकेबाज इनिंगमध्ये १२ चौकार आणि ८ षटकार ठोकले होते. सेहवागच्या धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली होती.

३) रिद्धीमान साहा

भारताचा माजी विकेटकीपर आणि फलंदाज रिद्धीमान साहानेही आयपीएल गाजवलं आहे. २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना प्ले ऑफ सामन्यात साहाने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात आक्रमक फलंदाजी केली होती. साहाने ५५ चेंडूत नाबाद ११५ धावांची शतकी खेळी केली होती. याचदरम्यान साहाने १० चौकार आणि ८ षटकार ठोकले. शहाने शतक ठोकले पण पंजाब टीमचा केकेआर विरुद्ध ३ विकेट्सने पराभव झाला होता.

४) शेन वॉटसन

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने आयपीएल सीजन ११ मध्ये फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना शतक ठोकलं होतं. वॉटसनने सनरायजर्स हैद्राबाद विरोधात ५७ चेंडूत ११७ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. वॉटसनने या इनिंगमध्ये ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले होते. वॉटसनच्या शतकी खेळीच्या जोरावर सीएसकेने तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला होता.