MS Dhoni is an artist of calmness coolness and taking good decisions in pressure situations: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ होती. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यरने धोनीच्या क्रेझबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
व्यंकटेश अय्यरने एका पॉडकास्ट शो दरम्यान धोनीबद्दल केलेल्या संभाषणात सांगितले की, तो मैदानावर एका महान कलाकारासारखा दिसतो, ज्याला कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे ठाऊक माहित असते. तो जे करू शकतो, ते जागतिक क्रिकेटमध्ये दुसरे कोणी करू शकत नाही.
अय्यरने यावेळी सांगितले की, एका सामन्यादरम्यान तो चेन्नईविरुद्ध चांगली फलंदाजी करत होता. त्यावेळी तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने शॉर्ट मरुन बाद झाला. यानंतर त्याला वाटले की हा क्षेत्ररक्षक चुकीच्या स्थितीत उभा होता.
व्यंकटेश अय्यर म्हणाला, “मी चांगली फलंदाजी करत होतो आणि मी एक शॉट खेळला. जो शॉर्ट-थर्ड मॅनकडे फील्डरने झेल घेतला, आणि मी स्वतःशी विचार केला, शॉर्ट थर्ड-मॅन प्रथम स्थानावर नसावा, तो चुकीच्या स्थितीत उभा होता.” सामना संपल्यानंतर अय्यरने धोनीशी याबाबत चर्चा केली, तेव्हा त्याने सांगितले की, ज्या प्रकारे चेंडू त्याच्या बॅटमधून बाहेर पडत होता, सर्व क्षेत्ररक्षक अधिक चांगले असावेत, म्हणूनच मी असे क्षेत्ररक्षण सेट केले होते.
हेही वाचा – ODI WC 2011: ‘…म्हणून विराटने विजयानंतर सचिनला उचलून खांद्यावर घेतले’; वीरेंद्र सेहवागने केला खुलासा
व्यंकटेश अय्यर पुढे म्हणाला, “मी त्याला (धोनी) सामन्यानंतर विचारले, ‘का भाऊ’, आणि त्याने उत्तर दिले, ‘तू ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, सर्व क्षेत्ररक्षक खूप चांगले असायला हवे होते. त्यामुळेच मी त्याला थोडा सरळ ठेवला होता, आणि मला असे वाटले. याचा विचार मी कधीच केला नव्हता.”
आयपीएलच्या १६व्या मोसमातील व्यंकटेश अय्यरची कामगिरी –
आयपीएलच्या १६व्या हंगामातील व्यंकटेश अय्यरच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने १४ डावांत २८.८६ च्या सरासरीने एकूण ४१४ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि दोन अर्धशतकं पाहायला मिळाली. अय्यरला केकेआर संघाने संपूर्ण हंगामातील बहुतांश सामन्यांमध्ये त्याला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळायला मैदानात उतरवले. अय्यरने भारतीय संघासाठी आतापर्यंत ९ टी-२० आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.