T20 2022 Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज भारताच्या मातब्बर खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पार धुव्वा उडवला. मोठ्या कालावधीनंतर स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मैदानात दिसल्याने भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. दणदणीत विजयानंतर टीम इंडियन लिजेंड्सचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवराज सिंहने आपल्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलेला असून सर्व माजी खेळाडूंना एकत्र पाहणे हे क्रिकेटप्रेमींचं स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसत आहे. (ICC T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरला; रोहित शर्मा कर्णधार तर विराटला..)

युवराज सिंहने सोमवारी आपल्या माजी सहकाऱ्यांसोबत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला.यात सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, सुरेश रैना असे अनेक मान्यवर दिसत आहेत. हे खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ मधील इंडिया लीजेंड्सचा भाग आहेत. आपण पाहू शकता की व्हिडिओमध्ये युवराज सिंह डान्स करताना आणि इरफान पठाण आणि सुरेश रैना हे गाणे गाताना दिसत आहेत. यावेळी सचिनला पाहून तुम्हालाही नेहमी फोनमध्ये गुंतलेल्या, सेल्फी काढणाऱ्या तुमच्याही एखाद्या मित्राची आठवण नक्की येईल.

Video: तेंडुलकरची बॅट पुन्हा तळपली; दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सचिनचा ‘हा’ एक शॉट खाऊन गेला भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा युवराज सिंह ट्वीट

हा व्हिडिओ इंकानपूर हॉटेलमध्ये शूट केल्याचे समजत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ साठी इंडिया लिजेंड्सने कानपूरमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा ६१ धावांनी पराभव करत सत्राला चांगली सुरुवात केली आहे. स्टुअर्ट बिन्नीने ४२ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली तर त्यानंतर राहुल शर्माच्या १७ धावांत ३ बळींमुळे भारताचा पगडा यास्पर्धेत भारी झाला आहे.