Video of Shubman Gill’s sister Shahneel and Sara : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. अशाप्रकारे जोडल्या जाणाऱ्या नावांवर शुबमन किंवा साराने कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अलीकडेच सारा तेंडुलकर शुबमनची बहीण शाहनील गिलबरोबर दिसली. यानंतर सारा आणि शुबमन गिलच्या डेटिंगच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. सारा आणि शाहनीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सारा रात्री उशिरा शुबमनच्या बहिणीसह फिरताना दिसली –

सारा तेंडुलकर आणि शाहनील गिल रविवारी पापाराझींना एकत्र दिसले. सारा आणि शाहनीलचे एकत्र अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की सारा तेंडुलकर एका सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर शहनीलने स्टायलिश ग्रे कलरचा टॉप घातला आहे. सारा आणि शाहनीलचे रात्री उशिरा एकत्र फिरणे चाहत्यांच्या उत्कंठा वाढवत आहे.

सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांच्यात नेटिझन्स गोंधळले होते –

शुबमन गिलचे नाव यापूर्वी अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडले जात होते. शुबमन गिल कोणासोबत डेट करत आहे याबाबत नेटिझन्स गोंधळात पडले होते. पण कॉफी विथ करण सीझन ८ मध्ये सारा अली खानने मजेदार पद्धतीने तिचे नाव साफ केले होते. सारा अली खान म्हणाली की, तुमचा सर्वांचा गैरसमज झाला आहे. संपूर्ण जग चुकीच्या साराच्या मागे लागले आहे. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी अद्याप त्यांची नावे जोडले जात असल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा – Izhaan Custody : सानिया मिर्झा की शोएब मलिक, मुलगा इझहान कोणाबरोबर राहणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहनील गिल सोशल मीडियावर असते सक्रिय –

शुबमन गिलची बहीण शाहनील गिलबद्दल सांगायचे, तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर एक लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. जर तिच्या शिक्षणाबद्दल बोलायटे, तर तिने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून शिक्षण घेतले आहे, त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी चंदीगडला गेली होती. तिने २०१८-१९ मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निक विनिपेगमधून बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला आहे.