Vikram Solanki Disclosure about Hardik Pandya : आयपीएल २०२४ पूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या जुना संघ मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. आयपीएल २०२२ पूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला त्यांच्या संघात सामील करून कर्णधार नियुक्त केले होते. अष्टपैलू खेळाडूने पदार्पणाच्या हंगामातच संघासाठी चमत्कार कामगिरी आणि त्यांना ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. यंदाही त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. हार्दिकच्या या निर्णयावर गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे. हार्दिकच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असे सोलंकी म्हणाले.
हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत होती. त्यानंतर विविध अटकळीही लावल्या जात होत्या. गुजरातने २६ नोव्हेंबर रोजी त्याला कायम ठेवण्याची घोषणा केली आणि नंतर सर्वांना वाटले की कदाचित हार्दिकच्या जाण्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत, परंतु सोमवारी आयपीएलने जाहीर केले की हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये जात आहे.
हार्दिक पंड्याला फ्रेंचायझी सोडायची होती – विक्रम सोलंकी
गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांनी हार्दिक पंड्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अष्टपैलू खेळाडूने फ्रेंचायझी सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, “गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून, हार्दिक पंड्याने फ्रँचायझीसाठी दोन हंगामात शानदार कामगिरी केली. त्यामुळे संघाने टाटा आयपीएल चॅम्पियनशिप जिंकली. त्याचबरोबर एकदा अंतिम फेरीत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. त्याने आता आपला पदार्पण संघ मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
हेही वाचा – IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर, दोन्ही संघांच्या मालकांनी काय म्हटले? जाणून घ्या
हार्दिक पंड्याच्या पुनरागमनावर नीता अंबानीची प्रतिक्रिया –
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर संघाच्या मालकीन नीता अंबानी म्हणाल्या, “आम्ही हार्दिक घरी परतल्याने त्याच्या स्वागतासाठी रोमांचित आहोत. आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हा एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे. मुंबई इंडियन्ससाठी तरुण प्रतिभा असण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिकने खूप पुढे मजल मारली आहे. त्याच्या आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”
हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाला, “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. ही एक सुखद घरवापसी आहे. तो ज्या संघाकडून खेळतो त्याला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ अत्यंत यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की, तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी मोठे यश मिळवेल.”