Nita Ambani and Vikram Solanki had to say on Hardik Pandya’s decision : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याचा जुना आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. आयपीएल २०२४ साठी खेळाडूंच्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिकला ट्रेड विंडोच्या माध्यामातून सामील करुन घेतले. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून गाजत होत्या, मात्र आता याला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही संघांनी पुष्टी केली आहे की हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचा भाग आहे. दोन्ही संघांच्या मालकांनीही याबाबत आपली बाजू मांडली आहे. खुद्द हार्दिक पांड्याने मुंबईत परतल्यानंतर आनंद व्यक्त करणारा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

हार्दिक पांड्याने एक्सवर एक व्हिडीओ शेअर करताना लिहले की, “हे खूप छान आठवणीने परत आणते. मुंबई, वानखेडे, पलटन, परत आल्याने बरे वाटत आहे.” या व्हिडीओमध्ये हार्दिकचा आयपीएलमध्ये पहिल्यांदा बोली लागण्यापासून ते स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांच्या मालकांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

हार्दिक पांड्या परतल्यावर मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी म्हणाल्या, “आम्ही हार्दिक घरी परतल्याने त्याच्या स्वागतासाठी रोमांचित आहोत. आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हा एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे. मुंबई इंडियन्ससाठी तरुण प्रतिभा असण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिकने खूप पुढे मजल मारली आहे. त्याच्या आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”

हेही वाचा – ‘बेगानी शादी में अबदुल्ला…’, भारत-पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांना वसीम-गौतमने फटकारले

हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाला, “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. ही एक सुखद घरवापसी आहे. तो ज्या संघाकडून खेळतो त्याला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ अत्यंत यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की, तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी मोठे यश मिळवेल.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd T20 : यशस्वी-इशान आणि ऋतुराजने रचला इतिहास! टी-२० मध्ये तीन भारतीयांनी पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले, “गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने फ्रँचायझीला दोन हंगामात चमकदार कामगिरी करण्यास मदत केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ एकदा चॅम्पियन बनला, तर एकदा उप-विजेता ठरला. आता त्याने त्याचा जुना संघ मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो.”