Gautam Gambhir Targets Virat Kohli: गेल्या रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर विराट कोहलीच्या ऐतिहासिक ४९ व्या शतकी खेळीला पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने ‘स्वार्थी’ म्हटले होते. या संतापजनक वक्तव्यानंतर विराट कोहलीचे चाहते भडकले असतानाच आता भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने सुद्धा कोहलीची नाबाद १०१ धावांची खेळी भारताला त्रासदायक ठरली असती.

मेन इन ब्लूने वर्ल्ड कप २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विजय नोंदवत पूर्ण विश्वचषकात सलग आठ सामने जिंकले आहेत. उर्वरित सामन्यांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सर्वाधिक चर्चेत राहिला. या सामन्याचा सामनावीर कोहलीने त्याच्या ३५व्या वाढदिवशी, सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. मात्र यावरून स्पोर्ट्सकीडाशी बोलताना गंभीरने विचित्र दावे केले आहेत.

गंभीर म्हणाला की, “कोहलीने त्याच्या डावाच्या शेवटी वेग बराच कमी केला होता. जर ती चांगली खेळपट्टी असती तर नंतर दक्षिण आफ्रिकेने सुद्धा फायदा घेत भारताला त्रास दिला असता. कोहलीने तीन आकड्यांची धावसंख्या पूर्ण करण्यासाठी वेग कमी केला असावा पण हे भारतासाठी कठीण ठरू शकलं असतं. उलट ७७ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला श्रेय द्यायला हवा ज्याने १८९ धावांच्या भागीदारीत कोहलीमुळे आलेलं दडपण दूर केलं.”

“कोहलीसाठी टिकवून ठेवणारी डीप फलंदाजी करणे महत्त्वाचे होते पण मला वाटते की शेवटच्या ५-६ षटकांमध्ये त्याचा वेग अगदीच कमी झाला, कदाचित तो शतकाच्या जवळ होता, म्हणून असावा. पण मला वाटतं, आधीच पुरेशा धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरने तेव्हा चान्स घेतला आणि विराट कोहलीवरील दबाव कमी केला, त्याचे श्रेय त्याला द्यायला हवे. दोघांनीही मधल्या फळीत खेळताना चांगली फलंदाजी केली, केशव महाराज उत्तम फॉर्ममध्ये असताना त्यांनी परिस्थिती चांगली हाताळली. “

हे ही वाचा<< IND vs PAK चा थरार पुन्हा? विश्वचषक उपांत्य फेरीआधी ‘या’ ३ पैकी १ समीकरण जुळल्यास पाकिस्तानची होणार चांदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोहली आता या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आठ डावांत ५४३ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. भारताचा पुढील सामना रविवारी नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरू येथे होणार आहे.