ICC Latest ODI Rankings Announced: विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली होती. आता या खेळीचा दोन्ही खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. विराट कोहलीला आयसीसी क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा झाला असून आता तो नवव्या क्रमांकावर आला आहे. केएल राहुलने १५ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता केएल राहुल १७व्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तसेच भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत आता किती झाला बदल –
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणारा क्विंटन डी कॉक सातव्या क्रमांकावरुन सहाव्यावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षक फलंदाजाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम २१व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या खेळाडूने ११ स्थानांची झेप घेतली आहे. नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध फ्लॉप ठरलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळलेला शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावणाऱ्या डेव्हिड मलानला क्रमवारीत फायदा झाला आहे.
कुलदीप यादवला क्रमवारीत झाला फायदा –
डेव्हिड मलानने आयसीसी क्रमवारीत ७ स्थानांनी झेप घेतली आहे. आता डेव्हिड मलान आठव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. आता इमाम उल हक सातव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. आता कुलदीप यादव आठव्या क्रमांकावर आहे.
आयसीसी वनडेतील फलंदाजी क्रमवारी
१. बाबर आझम- ८३५ गुण
२. शुबमन गिल- ८३०
३. रॅसी व्हॅन डर डुसेन – ७५८
४. हॅरी टेक्टर – ७२९
५. डेव्हिड वॉर्नर- ७२९
६. क्विंटन डी कॉक- ७२४
७. विराट कोहली- ७१५
८. दाविद मालन – ७११
९. इमाम-उल-हक – ७०५
१०. हेनरिक क्लासेन – ६९८