देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली घरात आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरातच आहे. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे सारेच कंटाळले आहेत, पण करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे तितकेच गरजेचे आहे.
स्टीव्ह वॉ सर्वात स्वार्थी क्रिकेटपटू – शेन वॉर्न
मध्यंतरी अनुष्का शर्माने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती विचित्र आवाजात ‘कोहली, चौका मार ना…’ असं ओरडत होती. त्यानंतर आता अखेर कोहलीला चौकार मारण्याची संधी मिळाली. ट्विटरवर एक व्हिडीओ एका चाहत्याने पोस्ट केली. लॉकडाउनमुळे घरात असलेले विरूष्का अखेर त्यांच्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी निघाले. त्याचा एक व्हिडीओ जवळच्या इमारतीत राहणाऱ्या एका चाहत्याने शूट केला आणि ट्विट केला. त्या व्हिडीओमध्ये चक्क अनुष्का आणि विराट यांच्या क्रिकेटचा सामना रंगल्याचे दिसले. खूप दिवसांनी विराटला फलंदाजी करताना पाहिले. अनुष्काने त्याला गोलंदाजी केली, अशा आशयाचे कॅप्शन त्या चाहत्याने व्हिडीओला दिले.
पाहा व्हिडीओ –
Finally after so much long time saw Virat Batting
Virat Anushka playing cricket in building today
Anushka bowls a Bouncer to Virat#ViratKohli #AnushkaSharma #Cricket pic.twitter.com/XFmfs3hiBt
— Virarsh (@Cheeku218) May 15, 2020
विराटचा एक रिप्लाय अन् वादच संपला…
दरम्यान, आधीच्या एका व्हिडीओमध्ये अनुष्का विचित्र आवाजात ओरडताना दिसली होती. अनुष्का शर्मा त्या व्हिडीओत कोहलीचं नाव जोरजोरात ओरडताना दिसत होती तसेच त्याला चौकार मारायला सांगत होती. त्यावेळी अनेकांना असं वाटलं की कोहली क्रिकेट खेळत आहे. पण तसं नसून कोहली शांत बसलेला होता. त्यामुळे कोहलीने तिच्याकडे विचित्र पद्धतीने बघितलं.