IND vs NZ Virat Kohli 50th Centuary Moment Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात ५० वे शतक पूर्ण केले आहे. हा क्षण प्रत्यक्ष जगल्यावर आता कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीने आपल्यासाठी हा क्षण स्वप्नाहून सुंदर असल्याचं सांगितलं आहे. विराट म्हणाला की, “आज सचिन पाजी मैदानात होते, इतक्या महान आणि माझ्यासाठी प्रेरणास्थान असलेल्या व्यक्तीने माझं कौतुक करणं हे माझ्यासाठी सर्व काही आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी इथे पोहोचेन पण समजा जर मी कधी हे स्वप्न पाहिलं असतं तर ते माझ्या स्वप्नात आज घडलं त्याच रूपात असतं. माझा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि तेव्हा मला हे साध्य करणे शक्य झालं हे माझ्यासाठी सर्व काही आहे. “

विराट कोहलीने आपल्या ५० व्या शतकाच्या आनंदात आपल्या पत्नीचा म्हणेजच अभिनेत्री अनुष्का शर्माचा सुद्धा खास उल्लेख केला. विराट कोहली म्हणाला की, ” आज माझी आयुष्याची जोडीदार, ज्या व्यक्तीवर माझं सर्वात जास्त प्रेम आहे अशी अनुष्का आज मैदानात होती तिच्यासमोर मला इतकं खेळता आलं हे माझ्यासाठी खूप खास होतं. आज सगळं काही जुळून आलं होतं. वानखेडेचं मैदान, उत्साही प्रेक्षक, माझं प्रेम आणि माझा आदर्श यांच्यासमोर मला मिळालेलं यश हे स्वप्नवत आहे.”

हे ही वाचा<< विराट कोहलीच्या ५० व्या शतकाचा क्षण ‘इथे’ पुन्हा पाहा; अनुष्का व सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया बघून भारावून जाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर सचिन तेंडुलकरने सुद्धा खास पोस्ट करून त्याचे मनसोक्त कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला की, “मी जेव्हा त्याला पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये भेटलो तेव्हा बाकीच्यांनी त्याची मस्करी करत त्याला माझ्या पाया पडायला लावले होते आणि आज त्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. एका भारतीयाने माझा रेकॉर्ड मोडणं माझ्यासाठी अत्यंत खास आहे त्यातही मुंबईत माझ्या घरच्या मैदानात हा पराक्रम करणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे”