Virat Kohli has shared a photo of his face injury on his Instagram story : टीम इंडियाचा माजी कर्णधार कोहलीने सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर एक आश्चर्यकारक स्टोरी पोस्ट केली आहे. फोटो पाहून कुणीही म्हणेल, काय झालंय? विराट कोहली गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. त्याच्या नाकावर पट्टी दिसते. कपाळावर व गालावर जखमेच्या खुणा आहेत. डोळेही काळे झाले आहेत. मात्र, या फोटोत कोहली हसत हसत विजयाची निशाणी दाखवत आहे.

फोटो पाहिल्यानंतर विराट कोहलीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त आहे. एका नामांकित कंपनीसोबत सशुल्क भागीदारीसाठी त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. म्हणजे हा फोटो केवळ प्रसिद्धीसाठी आहे. विराटच्या इन्स्टा स्टोरीवर तुम्ही ते पाहू शकता. हा फोटो लावण्याचा उद्देशही वर लिहिलेला दिसतो.

विराट कोहलीने विश्वचषकात चमकदार कामगिरी –

विराट कोहलीने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. यादरम्यान त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडला. विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले. विश्वचषकात त्याने ११ सामन्यांच्या ११ डावात ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. या काळात त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. विराटची वनडे विश्वचषकातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. मात्र, संघ चॅम्पियन होऊ शकला नाही, याची खंत त्याच्या मनात कायम असेल.

हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबईकडे परतला; गुजरात टायटन्सनं IPL विजेत्या कर्णधाराला केलं करारमुक्त!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती –

विराट कोहली आणि रोहित शर्मासह टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू २०२३ च्या वर्ल्ड कपपासून मैदानापासून दूर आहेत. हे खेळाडू डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर परत येऊ शकतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत युवा संघ चांगली कामगिरी करत आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे.