Virat Kohli Ind vs Pak Asia Cup 2023: भारतीय क्रिकेटप्रेमींची आस आपल्या खांद्यावर घेऊन खेळणारा विराट कोहली सद्य घडीला जागतिक क्रिकेटमधील मोठे नाव आहे. विराट कोहलीचे अनेक चाहते जगभरात आहेत. क्रिकेटच्या मैदानातील भारताचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, पण पाकिस्तानातील खेळाडू आणि नागरिक सुद्धा विराटच्या प्रेमात आहेत. आशिया चषकाच्या पहिल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात एका तरुणीने पाकिस्तानला पाठिंबा देत असतानाही विराट बाद झाल्यावर दुःख झाल्याचे म्हटले होते यावरूनच विराटवरील चाहत्यांच्या प्रेमाचा अंदाज लावता येऊ शकतो. विराटने अशा असंख्य चाहत्यांना काही वेळा तर खेळाडूंना सुद्धा आपली सही असलेल्या जर्सी गिफ्ट केली आहे. पण स्वतः विराटने आपल्या घरात कोणाच्या हिची जर्सी जपून ठेवलीये हे माहितेय का?

आशिया चषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर चार सामन्याच्या प्री शो दरम्यान विराटची एक जुनी मुलाखत दाखवण्यात येत होती. यामध्ये विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा पूर्ण करून केलेल्या विक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच कोहलीने आपल्याकडील एका खास गिफ्टची सुद्धा गोष्ट सांगितली.

विराट म्हणाला की, ” मी लहानपणापासून सचिन तेंडुलकर यांना माझा आदर्श मानलं आहे. त्यामुळे जेव्हा मी पाकिस्तानसमोर १८३ धावा केल्या तेव्हा सुद्धा त्यांना काय वाटत असेल, ते काय बोलतील असं माझ्या डोक्यात सुरु होतं.” पुढे आपल्याकडील खास जर्सीविषयी विराट म्हणाला की, “माझ्या घरी फक्त एकच जर्सी आहे, माझ्या पहिल्या टेस्ट सेंच्युरीची जर्सी, ज्यावर सचिन तेंडुलकरची सही आहे.” याच मुलाखतीत विराटने सध्या आपल्याला जागतिक क्रिकेटमध्ये बेन स्टोक्स खेळाडू म्हणून आवडतो असेही सांगितले.

हे ही वाचा<< “सचिन तेंडुलकरमध्ये बॉलिंगचा कीडा..”, रवी शास्त्रींचं विधान; क्रिकेटच्या देवाचा विकेट्सचा रेकॉर्ड वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच्या आशिया चषकात आतापर्यंत विराट कोहलीची खरी जादू पाहायला मिळालेली नाही. त्यातही पहिले दोन सामने तर पावसामुळे रद्दच झाले असल्याने सध्या भारतीय संघावर दडपण सुद्धा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या राखीव दिवशी सुरु असलेल्या खेळात आता विराट कोहली व के. एल. राहुल खेळत आहेत.