भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने १३ डिसेंबर २०१५ रोजी त्याची मैत्रीण रितिका सजदेहसोबत लग्न केले. आज रोहित आणि रितिका यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना समायरा ही मुलगीही आहे. रोहित आणि रितिका यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यादरम्यान, एक जुना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो रोहित आणि रितिका यांच्या संगीत सोहळ्याचा आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत ‘सारी के फॉल सा कभी मैच किया रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रोहित शर्माच्या संगीत सोहळ्यात विराटने पांढऱ्या रंगाचा पठाणी स्टाइल कुर्ता-पायजामा परिधान केला आहे. रोहित आणि रितिका यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा एकदा प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘‘वर्ल्डकप सामन्यात तुझं विराटशी काय बोलणं झालं?”, वाचा पाकिस्तानच्या कॅप्टननं दिलेलं ‘आश्चर्यजनक’ उत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीच्या डान्सच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. हरभजन सिंग, युवराजच्या लग्नातही विराटनेही जबरदस्त डान्स केला होता. विराट अनेकदा क्रिकेटच्या मैदानावरही नाचताना दिसतो. त्याच्या वेगवेगळ्या डान्स मूव्हचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

रोहित शर्माच्या लग्नात क्रिकेटपटूंपासून ते बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानही उपस्थित होता. रोहितच्या लग्नाला सोहेल खान अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, शिखर धवन, प्रग्यान ओझा, राहुल शर्मा आले होते.