रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीग २०२४ च्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयानंतर भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याने महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिचे व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरूध्द झालेल्या सामन्यात आरसीबीने आठ गडी राखून विजय मिळवला. फायनलमधील या विजयासह आरसीबी संघाने आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगमध्ये मिळून पहिल्यांदाच जेतेपद जिंकले आहे. विराट कोहलीनेही सर्व संघाचे व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले, ज्याचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर विराट कोहलीने महिला संघाला व्हिडिओ कॉल करून त्यांचे अभिनंदन केले. विराट कोहलीने संघाची कर्णधार स्मृती मानधना हिच्याशीही संवाद साधला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RCB महिला संघाच्या खेळाडू विराट कोहलीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहेत.

आरसीबीचा पुरुष संघ गेल्या १६ वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. फाफ डू प्लेसिस हा संघाचा सध्याचा कर्णधार आहे आणि संघ यावर्षी २२ मार्चपासून आयपीएलमध्ये आपल्या मोहिमेची सुरूवात करणार आहे. विराट कोहली देखील आयपीएलच्या आधी भारतात परतला आहे आणि लवकरच संघात सामील होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीने कधीही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नव्हते, परंतु महिला संघाने केवळ दोन हंगामात पहिले विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीने एकूण तीन वेळा आयपीएल फायनलसाठी पात्रता मिळवली, परंतु प्रत्येक वेळी त्यांना निराशेचा सामना करावा लागला. पण महिला संघाने ही कामगिरी करताच विराट कोहलीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विलंब केला नाही.