scorecardresearch

Premium

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने महेंद्रसिंग धोनीबाबत दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “धोनी कोणत्याही संघाला…”

पाकिस्तानच्या या माजी दिग्गज खेळाडूने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे,

MS Dhoni Latest News Update
एम एस धोनीबाबत माजी दिग्गज खेळाडूने मोठी प्रतिक्रिया दिलीय. (Image-Twitter)

CSK Skipper MS Dhoni Latest News Update : पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अकरमने एम एस धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धोनीला एक महान कर्णधार आणि क्रिकेटर म्हणून संबोधित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराचं कौतुक करतानाच स्विंग ऑफ सुलतान नावाने ओळखल्या जाणाऱ्या अकरमने म्हटलं आहे की, धोनीकडे कोणत्याही संघाला जिंकवण्याची क्षमता आहे.

वसीम अकरमने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “धोनी एक महान क्रिकेटर आहे. एक महान कर्णधार आहे. एकाच संघाला पाचवेळा आयपीएल किताब जिंकवून देणं खूप मोठी गोष्ट आहे. आयपीएल एक मोठी टूर्नामेंट आहे. यामध्ये दहा संघांचा समावेश असतो. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक संघाला १४ सामने खेळावे लागतात. पण धोनीला तुम्ही कोणत्याही संघासोबत जोडा, तो त्या संघाला फायनलपर्यंत घेऊन जाणार आणि चॅम्पियनही बनवणार.”

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

नक्की वाचा – कोण जिंकणार WTC फायनल? भारत-ऑस्ट्रेलियाबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूने केला दावा, म्हणाला, “टीम इंडियाला खूप कठीण..”

“आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद जिंकणं सीएसकेसाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. तो एक लोकप्रिय संघ झाला आहे आणि ते सुद्धा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण टूर्नामेंटमध्ये. धोनीकडे अनुभव आणि शांती आहे. तसंच त्याचा फिटनेसही खूप चांगला आहे. त्याच्याकडे खेळायची जिद्द आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही फिट असाल, पण तुमच्याकडे खेळण्याची जिद्द नसेल, तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नाहीत.”, असंही अकरमने म्हटलं आहे.

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेनं यंदाच्या आयपीएल हंगामात जेतेपद पटकावलं. पाचवेळा आयपीएल किताब जिंकून चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना रंगला. या सामन्यात सीएसकेनं गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wasim akram gives big statement about ms dhoni he can make ant team win in the tournament as csk won 5th time ipl trophy nss

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×