scorecardresearch

IND vs AUS 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मिस्टर ३६० सुर्याला संघात स्थान नाही, भारतीय दिग्ग्जाने निवडली प्लेईंग ११

टीम इंडियाचा माजी दिग्गज कसोटी क्रिकेटपटूने ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या ‘द-स्काय’ सूर्यकुमार यादवला अंतिम अकरामध्ये स्थान दिलेले नाही. त्यामुळे सुर्या हा पहिल्या पसंतीचा खेळाडू नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

IND vs AUS 1st Test: Wasim Jaffer chose his playing XI for the first test dropped the star player Suryakumar Yadav
सौजन्य- (ट्विटर)

AUS vs IND XI 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ ला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पहिली कसोटी गुरुवारपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील भारताचा माजी सलामीवीर मराठमोळ्या वसीम जाफरने पहिल्या कसोटीसाठी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. मात्र रोहितची खरी कसोटी संघ निवडताना लागणार असून त्याच्यासाठी ही तारेवरची कसरत आहे. शेवटी कर्णधार काय करतो आणि खेळपट्टी कशी असेल यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.

माजी फलंदाज वसीम जाफरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली करताना अष्टपैलू डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या ‘द-स्काय’ सूर्यकुमार यादव यांना या दोघांना संघात स्थान दिलेले नाही. जाफर म्हणाला की, “अक्षर पटेलची संघात निवड न करणे कठीण आहे पण कुलदीप हा रिस्ट स्पिनर म्हणून विविधता आणतो.”

जाफरने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. याशिवाय मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि शुबमन गिल आहेत. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी त्याने न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीयमध्ये द्विशतक ठोकलेल्या शुबमनची निवड केली आहे. त्याने २०२३ मध्ये भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. केएस भरतची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋषभ पंत या मालिकेचा भाग नाही. मात्र जाफरने इशान किशनपेक्षा भारताला पसंती दिली आहे.

हेही वाचा: Kabaddi Player Rape: धक्कादायक! रौप्यपदक विजेत्या महिला कबड्डीपटूवर प्रशिक्षकाने केला अत्याचार, खासगी फोटो लीक करण्याची दिली धमकी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये वसीम जाफरने कर्णधार रोहित शर्माला सलामीचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार म्हणून वसीम जाफरने स्टार फलंदाज केएल राहुलची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी वसीम जाफरने आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे, तर चेतेश्वर पुजाराची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणि विराट कोहलीची चौथ्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:20 IST
ताज्या बातम्या