scorecardresearch

टीम इंडियाला कांगांरुंची डोकेदुखी अन् शुबमनने ‘हेड’चा झेल सोडला, रोहित शर्माने काय केलं? पाहा Video

India vs Australia 3rd ODI Score Updates : शुबमन गिलने ट्रेविस हेडचा झेल सोडल्यानंतर रोहित शर्माने दिलेली रिअॅक्शन झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ

India Vs Australia 3rd ODI Match Update
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ३री वनडे

India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु असून आज चेन्नईत निर्णायक सामना होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात विजयाची मोहोर उमटवण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू कंबर कसताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मैदानात उतरलेले ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि ट्रेविस हेडने सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला.

दोघांनी सावध खेळी करून ६८ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर हार्दिक पांड्याने टीम इंडियाला डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रेविस हेडला ३३ धावांवर बाद केलं. तत्पुर्वी, पांड्याच्या गोलंदाजीवर हेडने षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात मोठा फटका लगावला अन् चेंडू हवेत उडाला. पण सीमारेषेजवळ असणाऱ्या शुबमनने हेडचा झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुबमनच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही अन् हेडचा झेल सुटला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि कर्णधार रोहित शर्माने दिलेली रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – ODI World Cup 2023: भारतातील ‘या’ १२ शहरांमध्ये होणार विश्वचषकाचे सामने, या मैदानात रंगणार फायनलचा थरार

इथे पाहा व्हिडीओ

पांड्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत हेडला फलंदाजी करताना गोंधळात टाकलं होतं. त्यानंतर पांड्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेडने थर्डमॅनच्या दिशेनं हवेत फटका मारला होता. त्यावेळी मैदानावर थर्ड मॅनच्या फिल्डिंग पोजिशनवर असलेल्या कुलदीप यादवने हेडचा झेल पकडला. कुलदीपने या झेलचा अचूक अंदाज घेऊन हेडचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर पांड्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:51 IST

संबंधित बातम्या