टी २० वर्ल्डकप स्पर्धा रंगात असताना ऑस्ट्रेलियात महिला बिग बॅश लीग सुरु आहे. या स्पर्धेतील मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर या सामन्यात एका विक्रमाची नोंद झाली आहे. मेलबर्न स्टार्सची गोलंदाज किम गार्थने भेदक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे तिने तिन्ही षटकं निर्धाव टाकली. मेलबर्न स्टार्सने सिडनी थंडरला विजयासाठी १०९ धावांचं आव्हान दिलं होतं. किमच्या गोलंदाजीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

किम गार्थ आयर्लंडची क्रिकेटपटू आहे. तिने मेलबर्न स्टार्सकडून खेळताना पहिल्या षटकात दोन गडी बाद केला. पहिल्या षटकाच्या सुरुवातीच्या चार चेंडूवर दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. ताहिलिया विल्सन आणि फीब लिचफिल्ड यांना खातंही खोलता आलं नाही. किम गार्थचं दुसऱं षटक निर्धाव राहिलं. या षटकात एकही गडी बाद करता आला नाही. मात्र तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा किम गार्थची जादू दिसली. कॉरिन हॉल बाद करत निर्धाव षटक टाकलं.

२५ वर्षीय किम गार्थने आतापर्यंत ३४ एकदिवसीय सामन्यात ४४८ धावा केल्या आहेत. तसेच २३ गडी बाद केले आहे. तसेच ५१ टी २० सामन्यात ७६२ धावा केल्या आहेत. तसेच ४२ गडी बाद केले आहेत.