Brandan King has suffered a side strain injury : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीचे सामने सुरु झाले आहेत. पण विंडीज संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्ट इंडिजचा इंग्लंडविरुद्ध ८ विकेट्सने पराभव झाला. आता सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजला पुढील सामने दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेविरुद्ध खेळायचे आहेत. त्याचबरोबर उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्ही सामने कोणत्याही किंमतीला जिंकावे लागतील. पण याआधीच वेस्ट इंडिजसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

स्टार फलंदाज ब्रँडन किंगला दुखापत –

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज ब्रँडन किंगला दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. पाचव्या षटकात सॅम करनचा एक चेंडू लागल्याने तो वेदनेने कोसळला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याने सामन्यात १२ चेंडूत २३ धावा केल्या होत्या आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. आता क्रिकेट वेस्ट इंडिजने त्यांच्या निवेदनात पुष्टी केली आहे की त्याला साइड स्ट्रेनचा त्रास होत आहे.

बरे होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो –

ब्रँडन किंगला झालेली साइड स्ट्रेनची दुखापत बरी होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागतो. ब्रँडन किंगची दुखापत बरी न झाल्यास २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणे त्याच्यासाठी कठीण होईल. जर तो सावरला नाही तर वेस्ट इंडिजकडे आंद्रे फ्लेचर, काइल मेयर्स, फॅबियन ॲलन, हेडन वॉल्श जूनियर आणि मॅथ्यू फोर्ड यांच्या रूपाने पाच राखीव खेळाडू आहेत. यापैकी कोणालाही संधी मिळू शकते.

हेही वाचा – VIDEO : ‘फक्त बायकोला घेऊन फिरा…’, हारिस रौफच्या वादानंतर माजी खेळाडू पीसीबी आणि पाकिस्तानी खेळाडूंवर संतापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल काय म्हणाला?

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल म्हणाला की होय, थोडी चिंता आहे पण आशा आहे की तो पुढील सामन्यात चांगली कामगिरी करू शकेल. तो आमच्यासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे आम्हाला माहीत आहे. वेस्ट इंडिजने ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि सलग चार सामने जिंकून सुपर ८ मध्ये स्थान पक्के केले होते. मात्र सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. २०१२ आणि २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषक जिंकला आहे.