Suryakumar Yadav Golden Ducks : टीम इंडियाचा स्टार फलंदाज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग तिसऱ्यांदा ‘गोल्डन डक’ झाला. या मालिकेत सूर्यकुमार तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाल्याने क्रिडाविश्वात अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज ठरलेला सूर्यकुमार वनेडत अशाप्रकारे बाद होईल, याचा कुणी विचारही केला नसेल. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने सूर्यकुमारला टीम इंडियात संधी मिळाली होती. पण सूर्यकुमारने तिनही सामन्यात सपशेल निराशाजनक कामगिरी केली. सूर्याने तिन्ही सामन्यात फक्त तीन चेंडूंचा सामना केला आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. सूर्यकुमार तीन वनडेत सलग गोल्डन डकने बाद होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

सूर्यकुमारच्या खराब फॉर्ममागे ही कारणे असू शकतात

१) मागील दोन सामन्यात केलेल्या खराब कामगिरीबाबत विचार करणं

जेव्हा सूर्यकुमार यादव तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्या डोक्यात मागील दोन सामन्यांच्या खराब कामगिरीबाबत विचार आले असतील. सलग दोन सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर एखादा खेळाडू तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करायला मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्या मनात खूप काही गोष्टी सुरु असतात. जसं की दोन विकेट घेतल्यानंतर गोलंदाज हॅट्रिकबाबत विचार करतो. पण इथे फलंदाजाच्या मनात वेगळा विचार असतो. तो हॅट्रिकपासून स्वत:चा बचाव करत असतो. त्यामुळे याच गोंधळात फलंदाजाचा चेंडूपर लक्ष गेला नसल्याची शक्यता आहे. त्याला पहिल्या चेंडूवर डिफेंस खेळण्याची किंवा धाव काढण्याची आशाही असते. तर दुसरीकडे गोलंदाज याच गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि सूर्याच्या इनिंगमध्ये गोलंदाज यशस्वी ठरला.

नक्की वाचा – हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार? भविष्यात ‘हा’ खेळाडू करणार गुजरात टायटन्सचं नेतृत्व, सोलंकीचं मोठं विधान

२) स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव

मागील दोन सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर फलंदाज तिसऱ्या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्न करतो. तो खेळाडू अन्य कोणत्या फॉरमॅटमध्ये नंबर वन असो किंवा दूसऱ्या फॉरमॅटमध्ये फ्लॉप कामगिरी केलेली असो, त्याच्यावर दबाव असण्याची शक्यता असते. सतत दिले जाणाऱ्या सूचना आणि टीममधून बाहेर काढण्याच्या इशाऱ्यांमुळं फलंदाजाच्या खेळावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. सूर्याच्या बाबतीतही असंच काहिसं घडलं असण्याची शक्यता आहे.

३) ७ व्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवणं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमारला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौथ्या नंबरऐवजी ७ नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. हा निर्णय चुकीचा असल्याचं काहींचं म्हणणं आहे. दोन सामन्यात गोल्डन डक झाल्यानंतर लगेच तिसऱ्याच सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये खालच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवणं सूर्यासाठी अयोग्य असल्याचं काहिंचं म्हणणं आहे. माझ्यासोबत असं का घडंल? असा विचारही सूर्याच्या मनात आला असेल. जर कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर विश्वास ठेऊन फलंदाजीसाठी मिडल ऑर्डरमध्ये पाठवलं असतं, तर कदाचित सूर्या मैदानात तळपला असता.