IND vs PAK Asia Cup Weather Report: आशिया चषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक शनिवारी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, पावसाचा मोठा धोका आहे. श्रीलंकेच्या दक्षिण भागात पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही वस्तुस्थिती आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) कळवण्यात आली आणि परिणामी, कॅंडीच्या जागी डंबुलाला पर्यायी ठिकाण म्हणून ऑफर करण्यात आले आहे. शनिवारच्या हवामान अहवालानुसार, पावसाची ७० टक्के शक्यता आहे, त्यामुळे सामना होण्याची शक्यता कमी आहे.

कॅंडी मधील हवामान परिस्थिती

भारताचे पुढील दोन सामने, पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध शनिवार आणि सोमवारी कॅंडी येथे होणार आहेत. हवामान खात्याच्या मते, कॅंडीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान पावसाची शक्यता सध्या ७० टक्के आहे. दुपारी २.३० वाजता (सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी) पाऊस पडणे अपेक्षित आहे ज्यामुळे नाणेफेक आणि अखेरीस सामना उशीर होऊ शकतो आणि जर पाऊस सुरू राहिला तर सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs PAK: बाबर आझमचा भारताविरुद्ध वन डेमध्ये आहे खराब रेकॉर्ड, यावेळी बदलणार ही आकडेवारी? जाणून घ्या

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होईल?

यंदाचा आशिया चषक ही ५० षटकांची स्पर्धा आहे आणि ग्राउंड स्टाफला सामना पूर्ण होईल याची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास, दोन्ही बाजूंकडील संघांना हे २० षटकांच्या लढतीसाठी तयार राहा, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही जर हे शक्य झाले नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये गुणांची विभागणी होईल. पाकिस्तान आपोआप सुपर ४ टप्प्यात प्रवेश करेल, कारण त्यांनी अ गटातील इतर संघ नेपाळला आधीच पराभूत केले आहे. भारताला पुढच्या फेरीत जाण्यासाठी नेपाळला त्यांच्या गट सामन्यात पराभूत करावे लागेल.

पल्लेकेले स्टेडियमची सद्यस्थिती काय आहे?

शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान गट अ सामन्याच्या आधी, होम टीम श्रीलंका त्याच ठिकाणी गुरुवारी ब गटातील सामन्यात बांगलादेशविरुद्ध आशिया चषक मोहिमेची सुरुवात करत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पाऊस आणि ओल्या आउटफिल्डमुळे त्यासामन्याला सुरु करायला खूप अडचणी आल्या. अधून-मधून काही पावसाच्या सरी देखील त्या सामन्यात येत आहेत. गेले तीन दिवस संततधार पाऊस आणि खराब हवामानामुळे मैदान तयार करणे मैदानातील कर्मचाऱ्यांना अवघड झाले होते. मात्र, एक चांगली बातमी आहे की सकाळच्या चित्रांमध्ये चमकदार सूर्यप्रकाश दिसला.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान गोलंदाजीत कोण आहे सरस? रवींद्र जडेजा म्हणाला, “आशिया चषकापूर्वी टीम इंडिया…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटच्या वनडेतही पावसाने व्यत्यय आणला होता

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर २०१९ साली झालेल्या ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा शेवटचा एकदिवसीय सामन्यात पावसाने खोडा घातला होता. मँचेस्टरमधील त्या सामन्यात भारताने DLS पद्धतीने ८९ धावांनी विजय मिळवला होता.