scorecardresearch

Premium

WTC Final IND vs AUS: भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत पार केलेले सर्वोच्च लक्ष्य कोणते? जाणून घ्या

WTC Final 2023 IND vs AUS: ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४४४ धावांचा भला मोठा डोंगर लक्ष म्हणून ठेवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने यशस्वीपणे पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य कोणते आहे आणि ते केव्हा पार केले होते, जाणून घेऊया.

WTC Final 2023 IND vs AUS Match Updates
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली (फोटो ट्विटर)

India need 280 to win in WTC Final 2023: लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघांत डब्ल्यूटीसी फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या दोन्ही डावांच्या जोरावर भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले. भारतासमोर ठेवलेले डोंगराएवढे लक्ष्य पार करु शकेल का? अशी चिंता भारतीय संघाच्या चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे आज आपण भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीपणे पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य कोणते आहे, ते जाणून घेऊया.

भारताला विजयासाठी २८० धावांची गरज –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. ४४४ धावांच्या लक्ष्याचा प्रत्युत्तरात भारताने चौथ्या दिवसअखेर तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने ४० षटकांत ४.१च्या धावगतीने या धावा काढल्या. भारताला शेवटच्या दिवशी ९० षटकांत २८० धावा करायच्या आहेत आणि सात विकेट्स शिल्लक आहेत. विराट कोहली ४४ आणि अजिंक्य रहाणेने २० धावांवर नाबाद आहेत. आतापर्यंत या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ११८ चेंडूत ७१ धावांची भागीदारी झाली आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

कसोटी क्रिकेटमध्ये भारताने पार केलेले सर्वोच्च लक्ष्य –

भारताविरुद्ध सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने यशस्वीपणे पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे ४०३ आहे. तसेच भारताने २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध यशस्वीपणे पाठलाग केलेले दुसरे सर्वोच्च लक्ष्य ३८७ आहे. या दोन्ही लक्ष्याच्या तुलनेत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य आतापर्यंतचे सर्वात मोठ लक्ष्य आहे. आता हे लक्ष्य भारतीय संघ पार करणार की नाही, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यामधये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या वेगवान माऱ्यामुळं मार्नस लाबुशेन झाला जखमी, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाकडून २७० धावांवर डाव घोषित केला –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 22:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×