Asia Cup 2025 Live Streaming Details: येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा सर्व संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येतील? जाणून घ्या.

भारतीय संघाचा पहिला सामना कधी?

या स्पर्धेतील पहिला सामना ९ सप्टेंबरला होणार आहे. तर १० सप्टेंबरला भारतीय संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना युएईविरूद्ध होणार आहे. तर बहु्प्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार १४ सप्टेंबरला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने येऊ शकतात. मात्र, जर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हे दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने येऊ शकतात.

या ८ संघांचा समावेश

आशिया चषक २०२५ स्पर्धेत एकूण ८ संघ जेतेपदासाठी भिडताना दिसणार आहेत. ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, ओमान, युएई, हाँगकाँग आणि बांगलादेश या संघांचा समावेश असणार आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपण तुम्ही सोनी लिव अॅपवर पाहू शकता. या सामन्याचे समालोचन हिंदी, इंग्रजीसह स्थानिक भाषांमध्ये देखील केले जाणार आहे.

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू- प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग