India vs Australia 1st T20I Live Streaming Updates : आयसीसी टी-२० विश्वचषक अवघ्या सहा महिन्यांवर असताना, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेचा समारोप बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. या मालिकेतील सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगबद्दल जाणून घ्या.

भारताच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेचा भाग असलेल्या बहुतेक भारतीय खेळाडूंना या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. जगातील नंबर वन टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवेल, तर मॅथ्यू वेडला पाच सामन्यांच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये, ऑस्ट्रेलियन संघाने भारतासोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती. ज्यामध्ये भारताने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकले आणि मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका २०२३ च्या विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसंदर्भात सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.

हेही वाचा – Team India: भारतीय संघ पहिल्यांदाच खेळणार ‘या’ देशाविरुद्ध टी-२० मालिका, जाणून घ्या तीन सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेची लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती –

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना किती तारखेला आहे?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०७:०० वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना कोणत्या मैदानावर होणार आहे?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील पहिला सामना डॉ. वाय. एस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे होणार आहे.
कोणते टीव्ही चॅनेल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका प्रसारित करतील?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका स्पोर्ट्स 18 नेटवर्कद्वारे प्रसारित केली जाईल. सामने टीव्हीवर, स्पोर्ट्स 18, कलर्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिटवरही पाहता येतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर विनामूल्य उपलब्ध असेल.

हेही वाचा – IND vs AUS Final: विराट कोहलीच्या स्लेजिंगला मार्नस लाबुशेनची काय होती प्रतिक्रिया? विश्वचषक फायनलनंतर केला खुलासा

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार