टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या सोशल मीडियावर खूप गाजतो आहे. सध्या तो त्याच्या क्रशला भेटायला गेला असून त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर तो ट्वीटरवर ट्रेंड करू लागला आहे. क्रिकेटसोबतच रवींद्र जडेजा त्याच्या लग्झरी लाइफ आणि स्टायलिश लुकसाठीही ओळखला जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर तो आता रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे.

रवींद्र जडेजा त्याच्या फार्म हाऊसवर निवांत क्षण घालवत आहे. यादरम्यान त्याचा आवडता घोडाही त्याच्यासोबत दिसतो. रवींद्र जडेजाला घोडेस्वारीचा किती शौक आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. जडेजा अनेकदा मोकळ्या वेळेत त्याच्या फार्म हाऊसवर घोडेस्वारी करताना दिसतो. फार्महाऊसमध्ये त्याच्याकडे खूप घोडे आहेत.

रवींद्र जडेजा त्याच्या फार्म हाऊसवर सुट्टीची मजा घेत असून छान वेळ घालवत आहे. त्यात मध्येच त्याची आवडती घोडीही त्याच्यासोबत दिसते. जडेजाने रविवारी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या घोडीसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट केली. “आयुष्भर तूच माझी क्रश असणार आहे”, हे वाक्य त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोंमध्ये जडेजा त्याच्या काळ्या रंगाच्या घोड्यासोबत दिसत आहे. फोटोंमध्ये जडेजाने लाल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पँट घातली असून डोक्यावर टोपी दिसत आहे.

सात वर्षापूर्वी रवींद्र जडेजाचे लग्न झाले

रिवाबा आणि रवींद्र जडेजा १७ एप्रिल २०१६ रोजी विवाहबंधनात अडकले. एका वर्षानंतर त्यांच्या मुलीचा जन्म झाला. लग्नापूर्वी रिवाबाला रिवा सोलंकी या नावाने ओळखले जात होते. मूळच्या जुनागडच्या असलेल्या रिवाबाने राजकोटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. रिवाबा आणि जडेजाची बहीण आधीपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. त्याच्या माध्यमातून दोघेही एकमेकांना भेटले.

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रवींद्र जडेजाने चांगला खेळ दाखवला. या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ४८ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय त्याने पहिल्या डावात १ बळी आणि दुसऱ्या डावात ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. जडेजाने ६५ कसोटी सामन्यात २६८ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: Team India: “आधी गंभीर, युवराज आणि मग मला काढून टाकले तसे…” टीम इंडियातील बदलांवर माजी खेळाडू सेहवागचे सूचक विधान

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे फिरकी गोलंदाज

४३३ – रंगना हेरथ

३६२ – डॅनियल व्हिटोरी

२९७ – डेरेक अंडरवुड

२६७ – रवींद्र जडेजा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६६ – बिशनसिंग बेदी