Who is Sameer Khan who stunned Marcus Stoinis and Steve Smith: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज नेटवर सराव करत असताना असे काही घडले, ज्याची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनाही अपेक्षा नसेल. वास्तविक, सराव दरम्यान, एक १६ वर्षांचा शालेय विद्यार्थी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्कस स्टॉइनिसला गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या गोलंदाजीने स्टॉइनिसला चकित केले. ज्यामुळे स्टॉइनिसला शाळेतील मुलाचे कौतुक करण्यास भाग पडले.
स्टीव्ह स्मिथ देखील त्रस्त होता –
इयत्ता ११वी मध्ये शिकणारा १६ वर्षीय डावखुरा समीर खान फिरकी गोलंदाजी करतो. गुरुवारी, त्याने सुमारे २० मिनिटे स्टॉइनिसला गोलंदाजी केली आणि त्याला एलबीडब्ल्यूही केले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अवघ्या १६ वर्षांच्या समीरची प्रतिभा पाहून इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूही थक्क झाले. स्टॉइनिसशिवाय या विद्यार्थ्याने स्टीव्ह स्मिथलाही गोलंदाजी करून त्रास दिला. हे पाहून सगळेच थक्क झाले. विद्यार्थ्याने सांगितले की, माझ्या प्रशिक्षकाने मला या स्थितीत गोलंदाजी करण्यास सांगितले नव्हते, मी स्टॉइनिसच्या पायाची स्थिती लक्षात घेऊन माझ्या इच्छेनुसार गोलंदाजी करत होतो.
समीर हा चादर विक्रेत्याचा आहे मुलगा –
समीर खान गरीब कुटुंबातील मुलगा आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचे वडील चादर विकतात. पंजाबच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या संभाव्य यादीत समीरला स्थान मिळाले आहे. या कारणास्तव, त्याला दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, जेणेकरून तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोलंदाजी करू शकेल. शाळेतील समीर खानने सांगितले की, मी पंजाब टी-२० लीगचे ७ सामने खेळले आहेत. मी ७ सामन्यात ५ विकेट घेतल्या. माझ्यासाठी तो एक अद्भुत अनुभव होता.
हेही वाचा – घे भरारी! चिमूरड्या अर्णवची थाय बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णझेप
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला एकदिवसीय सामना आज मोहाली येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्साठी आर आश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.
भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.